आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआय प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याऐवजी श्वानाचा फोटो, तरीही दिली परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मदिनापूर जिल्हा शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार रविवारी समोर आला. वेस्ट बंगाल स्टेट कांऊसिल व्होकेशनल ट्रेनिंगच्या प्रवेश परीक्षेच्या प्रवेश पत्रावर विद्यार्थ्याऐवजी श्वानाचा फोटो छापण्यात आला. विद्यार्थ्याने आयटीआयच्या वेबसाइटवरुन ओळखपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्याच्या फोटोच्या ठिकाणी श्वानाचा फोटो पाहून त्याला धक्काच बसला. व्होकेशनल ट्रेनिंग प्रशासनाने त्यांची चूक मान्य करत विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. प्रशासनाने या प्रकणी चौकशी केली जाईल असे सांगितले आहे.
काय आहे प्रकरण
मदिनापूर जिल्ह्यातील सौम्यदीप महंतो या विद्यार्थ्याने आयटीआयच्या वेबसाइटवरुन जेव्हा प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड केले तेव्हा त्याला धक्का बसला. त्याच्या फोटोच्या ऐवजी तिथे एका श्वानाचा फोटो होता. असे प्रवेशपत्र पाहून आपल्याला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारला तर वर्ष वाया जाईल, या भीतीने तो चिंतीत झाला. सौम्यदीप एका गरीब कुटुंबातील मुलगा आहे. तो त्याच्या शिक्षणासाठी एका गॅरेजमध्ये काम करतो. यामुळे त्याला परीक्षा विभागाच्या या कारभाराचा मोठा फटका बसण्याची चिंता लागून राहिली होती. मात्र व्होकेशनल ट्रेनिंग प्रशासनाने त्याला परीक्षा देता येईल असे सांगून त्याला मोठा दिलासा दिला.
जम्मू-काश्मीरमध्ये गायीला पॉलिटेक्निकला प्रवेश
याआधी मे महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये एका व्यावसायिक प्रवेश परीक्षेसाठी अधिकाऱ्यांकडून एका गायीला प्रवेश पात्र ठरवण्यात आले होते. पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी गाय पात्र असल्याचे पत्र देण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रवेशपत्रात उल्लेख केलेल्या गावाची आणि नावाची गाय उपलब्ध होती. वडीलांच्या नावाच्या जागी गुरा दंड असे लिहिलेले होते. या गायीच्या मालकाने तिला पॉलिटेक्निकला प्रवेश दिला पाहिजे असा आग्रह देखील धरला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गायीचे POHOTS...
बातम्या आणखी आहेत...