आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Study Finds Mothers Are Passing Harmful Pesticides To Babies Through Breastfeeding

RESEARCH : आईचे दूधही धोकादायक, किटकनाशकांचे प्रमाण 100 पट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा (हरियाणा) - नवजात मुलांसाठी सर्वात फायदेशीर समजले जाणारे आईचे दूधही आता सुरक्षित राहिलेले नाही? एका रिपोर्टनुसार आईच्या दुधात किटकनाशकाचे काही प्रमाण अधिक आढळल्याचे समोर आले आहे. सिरसा येथे एक किलो दुधामध्ये 0.12 मिलीग्राम एवढे पेस्टिसाइड आढळले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनने ठरवून दिलेल्या प्रमाणाशी तुलना करता हे प्रमाण 100 पटीने अधिक आहे.
रिपोर्टनुसार जर सरकारने खाद्यपदार्थांमध्ये धोकादायक अशा किटनाशकांच्या वापरावर अंकुश ठेवला नाही तर आगामी काळात नवजात मुलांवर त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळू शकतात. केंद्र सरकार ब्रेस्ट फिडींगसाठी (मुलाला आईचे दूध मिळावे म्हणून) मोठ्या प्रमाणावर अभियान चालवते.

सिरसा येथील चौधरी देवी लाल युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड एनव्हायरन्मेंटल सायंसेसच्या संशोधनाचे निष्कर्ष समोर आले आहेत. सिरसामध्ये ह्युमन मिल्कमध्ये पेस्टिसाइड्सच्या प्रमाणावर डॉ. रिंकी खन्ना यांनी संशोधन केले आहे. त्यांना आढळलेल्या निरीक्षणांनुसार लहान बाळांच्या शरिरामध्ये त्यांच्या आईच्या दुधाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पेस्टीसाइड्सवर आढळत आहेत. डॉ. रिंकी यांनी ४० महिलांच्या ह्यूमन मिल्कचे सँपल घेतले. तीन वर्षे हा अभ्यास करण्यात आला.
कारण काय ?
तज्ज्ञांच्या मते आपण ज्या प्राण्यांच्या दुधाचा वापर करतो त्यांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यामध्ये किटकनाशकांचे (पेस्टीसाइड्स) प्रमाण खूप जास्त असते. त्याशिवाय आईच्या शरिरात फॅट सॉल्युबल केमकल्स मिसळल्यामुळेही त्यांच्या शरिरात पेस्टीसाइड्सचे प्रमाण वाढते.