आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - बिहार पोलिसांनी शंभर कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक जप्त केले आहेत.त्यासोबत 16 जणांनाही अटक केली आहे. आरोपींकडून टपाल तिकीटे,एनएससी प्रमाणपत्रे आणि मोठ्या प्रमाणात विदेशी चलन जप्त करण्यात आले. आरोपी 100 रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंतचे बनावट मुद्रांक तयार करीत होते.
पाटण्याचे पोलिस अधिक्षक मनु महाराज यांनी सांगितले की,आरोपी झारखंड,उत्तर प्रदेश,ओडिशा,पश्चिम बंगाल आदी राज्यांचेही बनावट मुद्रांक तयार करीत होते.या टोळीच्या म्होरक्याचे नाव रंजीतकुमार आहे. बनावट मुद्रांक आणि महत्वपूर्ण बनावट दस्तऐवज बनवण्यासाठी दुस-या राज्यांमधून कच्चा माल मागवण्यात येत असे.कोणतीही चूक राहून जाऊ नये तसेच लक्षात येऊ नये यासाठी छपाई अत्यंत सावधगिरीने केली जात होती.
एसएमएसने ऑर्डर : आरोपी एसएमएसवर ऑर्डर घेत होते.ऑर्डर मिळाल्यानंतर बनावट मुद्रांक तयार करून देत होते.त्यानंतर त्याचा पुरवठा केला जायचा.याप्रकरणी झारखंड,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल,ओडिशा पोलिसांशीही संपर्क केला असल्याचे बिहार पोलिसांनी सांगितले.
अर्धा वाटा : बिहारमधील अधिकृत स्टँप व्हेंडर अर्धा वाटा घेऊन बनावट मुद्रांक विकत होते.जिल्हा प्रशासनच्या मदतीने या व्हेंडरवर कारवाई केली जाणार आहे,असे पोलिसांनी सांगितले.या टोळीतील सदस्य एका दिवसात अनेक कोट्यवधींचे मुद्रांक छपाई करीत होते असे ते म्हणाले.
तेलगीची आठवण : बिहारमधील मुद्रांक प्रकरणाने महाराष्ट्रातील मुद्रांक घोटाळ्याची आठवण होते.सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी अब्दुल करीम तेलगीच्या कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक घोटाळा उघडकीस आला होता.या घोटाळ्याने बडे राजकारणीही गोत्यात आले होते. तेलगी सध्या पुण्याच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.