आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीश उद्योगपतीच्या कन्येचा शाही विवाह, निमंत्रण पत्रिकेवर पाठवला LCD व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- कर्नाटकचे माजी मंत्री आणि अब्जाधीश उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांच्याकडे शाही विवाहाचे आयोजन करण्यात आहे. रेड्डी यांची कन्या ब्राह्मणीचा येत्या नोव्हेंबरमध्ये विवाह होणार आहे. विवाहासाठी खास निमं‍त्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक पत्रिकेवर एलसीडी स्क्रीन बसवण्यात आला आहे. यात रेड्डी फॅमिली व्हिडिओ सॉन्गच्या माध्यमातून पाहुण्यांना आग्रहाचे निमंत्रण देताना दिसते.

कन्नड भाषेत आहे 'अतिथि देवो भव:' सॉन्ग...
- पत्रिका उघडताच समोर एक छोटी एलसीडी स्क्रीन दिसतो. त्यावर 'ब्राह्मणी वेड्स राजीव रेड्डी' असे टेक्स्टमध्ये दिसते
- त्यानंतर व्हिडिओ प्ले होतो. त्यात जनार्दन रेड्डी, पत्नी, कन्या ब्राह्मणी आणि मुलगा राजीव हे सगळे कन्नडमध्ये अतिथि देवो भव: गीतावर लिप्सिंग करताना दिसतात.
- पत्रिकेवर मॅटरही प्रिंट केले आहे. पण, त्याकडे कोणाचे लक्ष जाण्यासाठीच ऑटो प्ले मोडवर सेट व्हिडिओ रण होतो.

बॉलीवुड सिनेमाप्रमाणे इन्व्हिटेशन थीम...
- व्हिडिओमध्ये इन्व्हिटेशनची थीम बॉलीवुडच्या सॉन्गप्रमाणे आहे.
- यात वर-वधू लाजत एकमेकांकडे पाहाताना दिसतात. दोघांची ओळख करून दिली जाते.
- लहंग्यात नववधु स्लो मोशनमध्ये फिरताना दिसते. नवरदेवामागे शुभ्र घोडे धावताना दिसतात.
- एक मिनिटाचा हा व्हिडिओ फॅमिलीच्या क्लोजअपने समाप्त होतो. साँग्ज मात्र शेवटपर्यंत सुरु असते. नंतर विवाह मुहुर्त आणि स्थळ दिसते.

नामी हस्ती विवाह समारंभात राहातील उपस्थित....
- रेड्डी कन्येच्या विवाह समारंभात बॉलीवुड आणि राजकारणातील नामी हस्ती उपस्थित राहाणार आहेत.
- ब्राह्मणी आणि राजीवचा गेल्या महिन्यात थाटात साखरपुडा झाला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, बेकायदा खाणप्रकरणी जनार्दन रेड्डी यांना झाला होता तीन वर्षांचा तुरुंगवास...
बातम्या आणखी आहेत...