आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: नेताजींच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास, बघा दुर्मिळ PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम मुझे खुन दो, मै तुम्हे आझादी दुंगा... असा नारा देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र लढा उभा केला. ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताच्या काही भागाला पहिल्यांदाच स्वातंत्र्य मिळवून दिले. देश सोडून जाण्यास ब्रिटिशांना भाग पाडले.
नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कडकमध्ये झाला. जपानच्या लष्कराची मदत घेऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्यांनी दिलेला "जय हिंद" हा राष्ट्रीय नारा झाला. या महानायकाचा त्याग आणि बलिदानामुळे भारताने स्वातंत्र्याच्या दिशेने आगेकुच केली होती. नेताजींनी आझाद हिंद सेनेत महिलांच्या तुकड्या तयार केल्या होत्या. पुरुषांच्या बरोबरीने लढण्याची महिलांना संधी दिली होती. त्यांच्या कुटनितीमुळे लगेच आझाद हिंद सरकार अस्तित्वात आले होते.
बघा नेताजींची दुर्मिळ छायाचित्रे, जी त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास सांगतात. divyamarthi.com अशीच काही दुर्मिळ छायाचित्रे आणि रोचक बाबी या पॅकेजच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करा...