आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subita Of Sikar Get First Rank In SC Class Of RPMT Rajasthan

वर्गणी जमा करून अंध पित्याने मुलीला शिकवले, मुलीने केले RPMT मध्ये टॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अंध पित्यासोबत आरपीएमटी परिक्षेत एससी कटातून प्रथम क्रमांक पटकावणारी सुबिता)
सीकर - काही करण्याची इच्छा मनात असेल तर असंख्य अ़डचणीही आपल्या इच्छेसमोर ठेंगण्या होतात. लहानपणीच आईचे छत्र हरवले, मात्र अंध वडीलांनी धीर दिला आणि यश पायाशी आले. अपंगत्व हे सुबिताच्या यशात अडथळा ठरू शकले नाही. तिने प्रत्येक अडचणीवर मात करून यश संपादन केले. अत्यंत वाईट परिस्थितीतही चिडावाच्या सुबिताने आरपीएमटीच्या निकालामध्ये एससी वर्गातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिने मिळवलेल्या या यशाची कहाणी एखाद्या चित्रपटाची कथाच वाटते.
वर्गणी गोळाकरून गाव कर्‍यांनी मुलीला शिकवले
गरिबीत जन्मलेल्या सुबिताच्या आईचा लवकरच मृत्यू झाला. त्यानंतर वडीलांनीच तिचे संगोपन केले. वडीलांची एकुलती एक मुलगी असल्याने गावकर्‍यांनीही अनेक वेळा वर्गणी गोळाकरून तिला शिकवले. 12 वीच्या परिक्षेत 82 टक्के मिळवल्यानंतर सीकर येथील सीएलसी संस्थेने सुबिताला शिक्षणासाठी दत्तक घेतले. त्यानंतर तीने एआयपीएमटीमध्येही यश संपादन केले. त्यानंतर आता पहिल्याच प्रयत्नात पीएमटीची परिक्षा सुध्दा ती उत्तीर्ण झाली आहे. सुबिता म्हणते की, यश कोणत्याही अचडणीला घाबरत नाही.

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत सुबिताने मिळवलेल्या यशामुळे सुबिता आणि तिच्या वडीलांना अश्रु अनावर झाले. वडील विलास कुमार म्हणाले की, आज मी गर्वाने म्हणू शकतो, की मुली ओझे नाहीत. जर त्यांना प्रेम आणि आत्मविश्वास दिला तर त्या कुटुंबाचे नाव उजळवतील.

सुबिताच्या या प्रयन्ताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, अडचणी ठरवूनसुध्दा यशाचा मार्ग नाही अडवू शकत.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या या इतर टॉपर्सबद्दल