आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेव्हीत सहभागी झाली खांदेरी पाणबुडी, शिवरायांच्या किल्ल्यावरून मिळाले आहे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडियन नेव्हीची शक्ती आणखी वाढवण्यासाठी गुरुवारी सकाळी अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असलेल्या खांदेरी पाणबुडीचा नेव्हीत समावेश करण्यात आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमएसडीएल) मध्ये डिफेन्स स्टेट मिनिस्टर सुभाष भामरे यांनी ही पाणबुडी इंडियन नेव्हीला हस्तांतरीत केली. नेव्ही या पाणबुडीच्या अनेक चाचण्या घेणार आहे. त्यानंतरच नेव्हीच्या वारझोनमध्ये त्याचा समावेश केला जाणार आहे. 

शिवरायांच्या किल्ल्यावरून मिळाले नाव
- खांदेरी सबमरीन माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने फ्रान्सच्या मेसर्स डीसीएनसी च्या मदतीने तयार केली आहे. 
- या पाणबुडीचे नाव समुद्रातील बेटावर तयार केलेल्या शिवाजी महाराजांच्या खांदेरी किल्ल्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 
- 17 व्या शतकात मराठ्यांच्या सागरी सामर्थ्यामध्ये या किल्ल्याची महत्त्वाची भूमिका होती. 
- खांदेरी पाणबुडी शत्रूच्या रडारला चकवू शकते. भारतातच ती तयार करण्यात आली आहे. 
- स्कॉर्पियन सिरिजची ही दुसरी पाणबुडी आहे. त्यापूर्वी एप्रिल 2015 मध्ये कलवरी पाणबुडीचा समावेश झाला होता. 

कठोर चाचणी करावी लागते पास 
- 12 जानेवारीला समुद्रात उतल्यानंतचर खांदेरी पाणबुडीला डिसेंबर 2017 पर्यंत अनेक चाचण्या पूर्ण कराव्या लागणार आहे. 
- त्यात बेटं आणि समुद्र दोन्ही ठिकाणांच्या चाचण्यांचा समानेश आहे. भारतीय नौदलात पहिली खांदेरी पाणबुडी 6 डिसेंबर 1986 मध्ये दाखल झाली होती. 
- सुमारे 20 वर्षांपर्यंत देशाची सेवा केल्यानंतर 18 ऑक्टोबर 1989 मध्ये ती नेव्हीतून रिटायर करण्यात आली होती. 

खांदेरीची वैशिष्ट्ये.. 
- शत्रूची माहिती मिळताच गाइडेड शस्त्रांद्वारे ही पाणबुडी हल्ला करते. 
- पाण्याखाली आणि जमिनीवरून दोन्ही ठिकाणांवरून हल्ला करण्यास सक्षम आहे. 
- त्यामुळे टॉरपीडोबरोबरच ट्यूबद्वारेही अँटी शिप क्षेपणास्त्राचा हल्ला करता येऊ शकतो. 
- स्टेल्थ टेक्निक इतर पाणबुड्यांच्या तुलनेत ही पाणबुडी सरस ठरते. 
- इतर पाणबुड्या करतात ती सर्व कामे ही पाणबुडी करू शकते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS..