आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subrata Roy News In Marathi, Supreme Court, Arrest

अटकेनंतरही सुब्रतो रॉय यांची बडदास्त कायम, आज करणार सर्वोच्च न्यायालयात उभे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - श्रीमंतीत आयुष्य घातलेल्या सुब्रतो रॉय यांची बडदास्त ठेवण्यात पोलिसही कुचराई करत नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी त्यांना लखनऊहून दिल्लीला आणण्यात आले, परंतु या वेळी त्यांच्यासोबत त्यांचा खासगी लवाजमा होता आणि ते पोलिसांच्या नव्हे तर स्वत:च्या वाहनातून दिल्लीला आले. मंगळवारी त्यांना सर्वोच्च न्यायालयापुढे उभे केले जाणार आहे.

गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी रुपये थकवल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. शेवटी त्यांनी शुक्रवारी पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. अटकेनंतर त्यांना लखनऊच्या एका गेस्टहाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. लखनऊहून दिल्ली जाण्यासाठी त्यांना पोलिसाच्या वाहनात बसण्यास सांगण्यात आले. परंतु त्यांनी त्यास नकार दिला आणि स्वत:च्या वाहनातूनच जाण्याचा हट्ट धरला होता.शेवटी पोलिसांनी त्यांच्या लवाजम्यासह दिल्ली गाठली.