आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त चहा विकून 4 वर्षांत बनला करोडपती, तरीही लग्नासाठी पाहावी लागली वाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनव टंडन आणि त्यांचा मित्र प्रमित शर्माने एकत्रच शिक्षण पूर्ण केले. - Divya Marathi
अभिनव टंडन आणि त्यांचा मित्र प्रमित शर्माने एकत्रच शिक्षण पूर्ण केले.
लखनऊ - यूपीच्या बरेलीत राहणारे दोन मित्र अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर 1 लाख रुपये गुंतवून चहा विकण्याचे स्टार्टअप सुरू केले. आज ते वार्षिक 1 कोटीहून जास्त उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक आहेत. खास बाब अशी की, दोघांनी 2013 मध्ये हा बिझनेस सुरू केला होता. आता "चाय कॉलिंग" एक ब्रँड बनला आहे. या नावाने 10 हून जास्त त्यांचे आउटलेट चालवत आहेत. अभिनव यांना आपल्या कामामुळे लग्नासाठी खूप वाट पाहावी लागली. उशिरा लग्न जमले. दोघांनी DivyaMarathi.Comशी केलेल्या चर्चेत आपले अनुभव शेअर केले.
 
असे गेले बालपण...
- अभिनव टंडन म्हणाले, मी आणि प्रमित शर्मा दोघेही बरेलीचे राहणारे आहोत. दोघांनी एकत्र शालेय शिक्षण घेतले. 
- आम्ही गाझियाबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि प्रमितने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. 
 
अशी आली चाय कॉलिंगची आयडिया...
- प्रमित म्हणाले, आम्ही दोघेही मित्र जेव्हा कॉलेजमध्ये सोबत शिक्षण घेत होतो तेव्हा चहा प्यायला सारखे बाहेर जायचो. चहा पिताना आम्हाला अनेकदा दुकानात घाण दिसायची. स्वच्छता नसल्याने अनेक दुकानांतून चहा न पिताच परत यायचो.
- हीच अडचण जॉब करत असतानाही आली. तेव्हा वाटले की, आपण असे काहीतरी करावे, जेणेकरून बिझनेसही होईल आणि लोकांना स्वच्छ-स्वादिष्ट चहाही मिळेल. यानंतर आम्ही दोघांनी "चाय कॉलिंग" नावाने आऊटलेट उघडण्याचा निर्णय घेतला होता.
 
25 हजार आणि 40 हजार रुपयांचा जॉब सोडला...
- अभिनव टंडन म्हणाले, इंजिनिरिंगचे शिक्षण झाल्यानंतर ते दिल्लीतील क्रॉम्प्टन फॅन बनवणाऱ्या कंपनीत क्वालिटी अॅनालिस्ट पदावर रुजू झाले. त्या वेळी मला दरमहिन्याना 25 हजार पगार मिळायचा. मी एका वर्षाने तो जॉब सोडला.
- प्रमितही इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टीसीएस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. माझ्याप्रमाणेच त्यानेही 1 वर्षाने जॉब सोडला. तेव्हा त्याला 40 हजार पगार मिळायचा.
 
2013 मध्ये हातगाडीवरून केली चाय कॉलिंगची सुरुवात...
- आम्ही दोघांनी एकत्र 2013 मध्ये जॉब सोडला यानंतर नोएडात एका ठेल्यावर चहा विकायला सुरुवात केली. त्या वेळी आम्ही चहासोबत सँडविचही विकायचो. या कामासाठी आम्ही एका मुलाला कामावर ठेवले होते. 6 महिन्यांत लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
- यानंतर आम्ही दोघांनी आपापल्या सेव्हिंगमधून 50-50 हजार रुपये जमवून 1 लाखांत बरेली शहरात चाय कॉलिंग नावाने आमचे पहिले आऊटलेट सुरू केले. येथे चहा आणि सँडविच विक्री सुरू केली. 
- मग मागे वळून पाहिलेच नाही. सहा महिन्यांतच हातगाडीवर सुरू केलेला बिझनेस आम्ही एका मोठ्या शॉपमध्ये कन्व्हर्ट केला. आम्ही नोएडामध्ये चहाची पहिली शॉप उघडली.
- आज चाय कॉलिंग एका कंपनीत कन्व्हर्ट झाली आहे. दहा आऊटलेटमधून आज 30 हून जास्त कर्मचारी काम करतात. त्यांना मिनिमम 6 ते 12 हजार पर्यंत पगार दिला जातो.
 
काय आहे चाय कॉलिंग?
- चाय कॉलिंग हे चहा विकणाऱ्या एका शॉपचे नाव आहे. हे आता एका कंपनीत रूपांतरित झाले आहे. येथे 15 प्रकारची चहा मिळते. एक सामान्य माणूस 2 रुपयांपासून ते नोकरदार वर्गातील व्यक्ती 30 रुपयांपर्यंतची चहा येथे खरेदी करून आस्वाद घेऊ शकतो.
- चाय कॉलिंगच्या आऊटलेटवर चहाशिवाय स्नॅक्सही मिळतात.
- दोघेही मित्र म्हणतात, चांगल्या कल्पनेला धाडसाची जोड दिली म्हणून आम्ही हे सर्व उभे करू शकलो.
 
कामामुळे लग्न जमत नव्हते...
- अभिनव म्हणाले, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगनंतर चाय कॉलिंगचे काम सुरू केले. यानंतर लग्नासाठी अनेक स्थळे येऊ लागली. परंतु माझ्या कामामुळे ती परत जाऊ लागली. लोक म्हणायचे इंजिनिअरिंग करूनही चहाचा कसा काय बिझनेस करतोय?
- लोक अचंबित होऊन माझ्याकडे पाहायचे. यामुळे अनेक स्थळे परत गेली. नंतर 2017 मध्ये माझ्यासाठी एक स्थळ आले. त्यांनीही मला तोच प्रश्न विचारला- काय काम करतोस? मीही तेच उत्तर दिले- चहाचा बिझनेस करतो. परंतु या वेळी मुलीकडच्यांनी थोडे आश्चर्य व्यक्त केले. चहामध्ये असा कोणता बिझनेस आहे बुवा? मग मी त्यांना व्यवस्थित माझी चाय कॉलिंगची कन्सेप्ट समजावली. यानंतर कुठे माझे अरेंज मॅरेज फेब्रुवारी 2017 मध्ये झाले.
- दुसरीकडे, प्रमित यांच्या लग्नात मात्र अडचण आली नाही. त्यांचे वडील बिझनेसमन होते. पूर्ण कुटुंबच बिझनेसमध्ये होते. यामुळे त्याला मुलगी द्यायला सर्वच एका पायावर तयार होते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...