आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1700 रुपयांची नोकरी सोडून सुरु केले स्टार्टअप, आता 1Cr टर्नओव्हर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी 1700 रुपयांची नोकरी सोडते आणि स्वतःचा उद्योग उभा करण्याचे ठरवते. राज्याच्या राजधानीतील अंजली सिंहने स्टार्टअपने आता महिन्याला 8 ते 10 लाख रुपये नफा कमावण्यास सुरुवात केली आहे. राज्यपालांच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या महिला उद्योजक पुरस्कारासह 4 पुरस्कारांनी अंजली सन्मानित आहे. आज एक कोटी टर्न ओव्हर असलेल्या अंजली सिंह यांना एअर होस्टेस होण्याची इच्छा होती. 
 
...यामुळे एअर होस्टेस होण्याची इच्छा, इच्छाच राहिली
- इंदिरानगरची रहिवासी अंजली सिंह (38) सांगते, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. लहानपणापासून एअर होस्टेस होण्याची इच्छा होती. मात्र कुटुंबाने दूर शिक्षणाला पाठवण्यास नकार दिला. मग लखनऊ विद्यापीठातून MBA केले.
- 2001 मध्ये MBA झाल्यानंतर शिवगड रिसॉर्टच्या चेन मार्केटिंगमध्ये 1700 रुपयांची पहिली नोकरी मिळाली. काही महिने काम केल्यानंतर हा जॉब सोडून दिला. 
- त्याच वर्षी ICFAI विद्यापीठाच्या लखनऊ ब्रँचमध्ये काऊन्सलर म्हणून जॉईन झाले. येथे 4 हजार रुपये पगार होता. 
- 2009 मध्ये प्रमोशन झाले याच विद्यापीठात 20 हजार रुपये पगार मिळायला लागला. आता अंजली मार्केंटिंग मॅनेजर होत्या. याच दरम्यान स्वतःचा उद्योग उभा करण्याची इच्छा तीव्र झाली. झाले, 20 हजार रुपये पगाराची नोकरी सोडली.  

एनजीओच्या कर्मचारीसोबत सुरु केला बिझनेस 
- अंजलीचे वडील बँक ऑफ इंडियात नोकरी करत होते. त्यांनी 1995 ला व्हिआरएस घेऊन भारतीय सेवा संस्थान नावाने एनजीओ सुरु केले होते. एनजीओला नॅशनल जूट बोर्ड मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल्सकडून जूटचे वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू तयार करण्याचे कंत्राट मिळाले होते. 
- याच एनजीओमध्ये काम करत असलेली शबनमला सोबत घेऊन अंजलीने जूट बॅग्ज आणि दुसऱ्या वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. हळुहळु या कामात 25-30 महिला आणखी जोडल्या गेल्या. 
- या महिलांनी मिळून मग एक कंपनी स्थापन केली. महिलांच्या या कंपनीला बँकेने 15 लाख रुपये कर्ज दिले. 
- सध्या या कंपनीच्या लखनऊमध्ये 4 ब्रँच आहे. यामध्ये 200 महिला काम करतात. कंपनीचे वार्षिक टर्नओव्हर 1 कोटी पर्यंत गेले आहे. 
 
पतीनेही नोकरी सोडून दिली अंजलीला साथ 
- अंजलीचे लग्न 2006 मध्ये शैलेंद्र सिंहसोबत झाले. तेव्हा शैलेंद्र दिल्लीतील एका कंपनीच्या बिझनेस स्कूलमध्ये व्हाइस प्रेसिडेंट होते. 
- लग्नानंतर काही वर्षांनी शैलेंद्र यांनीही नोकरी सोडली आणि पत्नीच्या कंपनीत हातभार लावायला लागले. त्यांना दोन मुले आहे. घरी सासू-सासरे. सर्वजण त्यांना कामात मदत करतात. 
 
या पुरस्कारांनी सन्मानित 
- 29 एप्रिल 2017 - राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते आउटस्टँडिंग वुमन एंटरप्रेन्योर पुरस्काराने सन्मानित.
- 8 मार्च 2017 - लखनऊ मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने बेस्ट वुमन एंटरप्रेन्योर पुरस्कार. 
- 8 मार्च 2017 - इस्टर्न मसाला कंपनीच्या वतीने बेस्ट वुमन एंटरप्रेन्योर पुरस्काराने सन्मानित.
- 26 ऑगस्ट 2017 जन मिस्ठा पुरस्काराने सन्मान.
- 29 ऑगस्ट 2017 महर्षि आणि इंटिग्रल विद्यापीठाच्या वतीने पुरस्कार. 
- 12 सप्टेंबर 2017 - फोकटेल संस्थेकडून सन्मान. 
बातम्या आणखी आहेत...