आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही तरुणी विदेशात शिकवते योगा आणि डान्स, दोन वर्षांत झाली अब्जाधीश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पायल काकडिया - Divya Marathi
पायल काकडिया
चंदीगड - कोणताही व्यवसाय पूर्ण क्षमतेने केला तर त्यात यश नक्की आहे, असे सर्वसाधारणपणे आपण सर्वच म्हणत असतो. अशाच आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करुन भारतीय वंशाची पायल कडकिया या तरुणीने फॉर्च्यून नियतकालिकाच्या पॉवरफूल महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे. पायल कडकिया स्टार्टअप क्लासपासची सीईओ आणि को-फाउंडर आहे. दोन वर्षांपूर्वी तिने न्यूयॉर्कमध्ये डान्सिंग स्टार्टअप क्लासपास सुरु केले आहे, आज 40 कोटी डॉलरच्या गुंतवणुकीसह (2634 कोटी रुपये) ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. येथे फिटनेस, डान्स आणि योग शिकवला जातो. पायल लवकरच एका पंजाबी कुटुंबाची सून होणार आहे.
पायल तीन वर्षांची होती तेव्हापासून तिला नृत्याची आवड आहे. ती पाच वर्षांची होत असताना स्टेजवरुन भारतीय क्लासिकल डान्स सादर करु लागले. वाढत्या वयासोबत तिच्या डान्सची आवड वाढत गेली. न्यूजर्सीमध्ये लहानाची मोठी झालेल्या पायलच्या आई-वडिलांनी भारतात विवाह केला आणि अमेरिकेत स्थायिक झाले. तिचे आई-वडील दोघेही केमिस्ट आहेत. त्यांच्या आरोग्य सेवेत तिनेही एक असे अप्लिकेशन तयार केले ज्यामुळे कँसरसोबत लढा देण्यास मदत होणार आहे.
शिक्षणासोबत पायल नृत्याचे धडेही गिरवत होती. जेव्हा तिची निवड एमआयटीसाठी झाली तेव्हा संशोधनाबरोबर तिने नृत्यही चालू ठेवले. वास्तविक संशोधन काळात तिला डान्ससाठी फारवेळ देता येत नव्हता मात्र दिवसातील काही तास का होईना ती डान्स प्रॅक्टिस करत होती. एमआयटीमध्येही तिने एक डान्स ग्रुप तयार केला आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एमआयटीतून ऑपरेशन मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्स मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर बेन अँड कंपनीत तिने नोकरी सुरु केली. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत ऑफिस आणि रात्री आठ ते दहा पर्यंत डान्स प्रॅक्टिस हा तिचा दिनक्रम ठरलेला होता.

याच दरम्यान बॉलिवूडच्या डान्स ग्रुपसोबत तिने काम सुरु केले. तीन वर्षे तिने बेन अँड कंपनीमध्ये काम केले. त्यानंतर काही दिवसांनी तिला वॉर्नर म्यूझिक ग्रुपमध्ये संधी मिळाली. त्यानंतर पायलला तिचा मार्ग सापडला. 2008 मध्ये तिने स्वतःची डान्स कंपनी सुरु केली. तिच्या कंपनीने सर्वप्रथम एल्विन एले येथे परफॉर्म केले, तिथे गर्दी जमवण्यात ती यशस्वी झाली होती. 2010 मध्ये जेव्हा सॅन फ्रान्सिस्को येथे तिने परफॉर्म केले तेव्हा ती लोकप्रिय झाली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पायल कडकियाचे PHOTOS...