आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics : याच वांगचुकने प्रेरित होता 3 Idiots चा वांगडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"थ्री इडियट्स' या चित्रपटात आमिर खानने फुनसुक वांगडू हे पात्र साकारले होते. लडाखमध्ये मुलांना शिकवण्याचे काम तो करायचा. मात्र, हेच कार्य सोनम वांगचुक नामक व्यक्ती मागील कित्येक वर्षांपासून करत आहेत.

वांगचुक २००८ मधील एक आठवण सांगतात, थ्री इडियट्सचे चित्रीकरण सुरू होण्याच्या चार महिन्यांपूर्वी त्यांची मुंबईत एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान आमिर खानशी भेट झाली. तिथे वांगचुक यांच्या जीवनावरील एक लघुपट तिथे दाखवण्यात आला होता. वांगचुक यांच्या मते, आमिर खानचे पात्र माझ्यावर प्रेरित नव्हते. मात्र, माझ्या जीवनाशी त्यांचे पात्र मात्र नक्कीच प्रभावित होते.

वांगचुक यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायची होती, तर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करावे, असे वडिलांचे म्हणणे असल्याने दोघांत वाद झाला. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडावे लागले. विज्ञान आणि गणिताचे चांगले ज्ञान असल्याने त्यांनी लेहमध्ये शिकवणी सुरू केली. दोनच महिन्यांत चार वर्षे शिक्षणासाठी लागलेला खर्च निघून गेला. मात्र, त्यामुळे मोठा बदल घडून अाला होता. गुणवंत असूनही मुलांना शाळेत अनुत्तीर्ण केले जात असल्याची खंत त्यांना जाणवत होती. तेव्हापासूनच त्यांनी शैक्षणिक सुधारणेसाठी काम करणे सुरू केले.

या दुर्गम भागात वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९८८ मध्ये "स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख' (सेकमॉल) ही मोठी चळवळ सुरू करून टाकली होती. पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीही वांगचुक यांनी विद्यार्थ्यांसोबत मिळून अभियान राबवले आहे. लडाखमध्ये शेती आणि वृक्षारोपणासाठी त्यांनी एक भन्नाट कल्पना आणली होती. यासाठी त्यांनी लोकांना सांगितले की, शेतात ४० मीटरपर्यंत उंचीचे बर्फाचे स्तूप बनवा. अशा स्तुपापासून १० हेक्टर जमीन बागायती करता येऊ शकते. एका स्तूपातून सुमारे कोटी ६० लाख लिटर पाण्याची व्यवस्था होते. लडाख भागात त्यांनी याची मोठी चळवळी सुरू केलेली आहे. पुढच्या वर्षी अशाप्रकारचे आणखी ९० स्तूप बनवले जाणार आहेत. हिवाळ्यात बनवलेल्या या स्तुपांतील बर्फ जूनपर्यंत उपयोगात आणला जाऊ शकतो. नॉर्फेलद्वारे बनवण्यात आलेल्या कृत्रिम हिमनगापासून वांगचुक यांना ही कल्पना सुचली. त्यांची संस्था लेहपासून १८ किमी अंतरावर आहे. मात्र, ते सर्वत्र कार्यरत असतात.

या भागात त्यांनी हजारांपेक्षा जास्त वृक्ष आणि बगिचे उभारले आहेत. त्यांची संस्था आणि विद्यालय हे पूर्णत: सौरऊर्जेवरच चालते. सरकारकडून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना वांगचुक यांच्या संस्थेत प्रवेश असतो. यापैकी कित्येक वैज्ञानिक, व्यावसायिक आणि मोठे अधिकारी बनले आहेत. वांगचुक सांगतात की, इंजिनिअरिंग हा माझा छंद आहे आणि आता मी पर्यायी विद्यापीठासाठी तयारी करतोय. यात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. मुलांना कौशल्य शिकवण्यावरच भर दिला जाईल.
सोनम वांगचुक, रिफॉर्मिस्ट
जन्म - सप्टेंबर१९६६
शिक्षण - एनआयटी श्रीनगरमधून इंजिनिअरिंग
वडील - सोनमवांग्याल, आई- शेरिंग
चर्चेचे - लडाखमध्ये शेतीसाठी मदतीचे ठरणारे त्यांनी बनवलेले स्तूप आताही आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सोनम वांगचुकचे शाळेचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...