आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनी स्थापनेसाठी एकीची साठीत सुरुवात, दुसरीने पतीचा मार खाल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - तेलंगणाच्या हसनाबादमध्ये दुष्काळ पाचवीला पुजलेला. इथे दरवर्षी दुष्काळ पडतो. कसेबसे उत्पन्न मिळूनही त्यातील काही वाटा आडत्यांना जातो. यातून राहिलेल्या पैशात वर्षभराच्या खर्चाचा ताळमेळ बसवावा लागतो. प्रयत्न करूनही खर्च न भागल्यास लोकांना मजुरी करणे भाग पडते. मात्र, आता येथील चित्र बदलले आहे. येथे धान्य विक्रीत आता आडते नाहीत. परिणामी थेट विक्रीमुळे पिकाला भावही चांगला मिळत आहे.
गावातील ६३ वर्षीय नागम्मा व ३५ वर्षीय लक्ष्मी या महिलांनी हा बदल घडवून आणला आहे. त्यांच्यासोबत सध्या ८०० महिला काम करत असून सर्व मालकिणी आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल २ कोटी रुपये आहे. कंपनीच्या संस्थापक समितीत १५ महिला आहेत. त्यातील तिघी जेमतेम दहावीपर्यंत शिकल्या असून अन्य अशिक्षित आहेत.
कंपनीच्या संचालक नागम्मा यांचे पती हयात नाहीत. गेल्या २० वर्षांपासून शेतीवर उपजीविका भागवतात. महिना-महिना कष्ट करूनही दुष्काळामुळे चांगले पीक हातात पडत नाही. त्यातही आडत्यांमुळे धान्याला योग्य भावही मिळत नाही. मिळालेल्या पैशातून खत, मुलांचे शिक्षण केल्यानंतर घर चालवणे अवघड ठरते. गावात नागम्मासारखीच आणखी एक महिला आहे,
लक्ष्मी. लक्ष्मी दूध विक्रीचा व्यवसाय करते तर पती मजुरीचे काम . दोघींना काम करूनही पैशाची पुरेशी जुळवाजुळव होत नाही. त्यामुळे आर्थिक तंगीतून बाहेर पडण्याचे त्यांनी ठरवले. २०१२ मध्ये एका संघटनेने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कंपनी स्थापन करण्याचा ग्रामस्थांना सल्ला दिला.

 तीन वर्षांपूर्वी महिलांनी कंपनीची नोंदणी केली.
 स्थापना समितीमध्ये तीन महिलाच फक्त दहावी उत्तीर्ण. अन्य अशिक्षित.
 १० गावांत केले जातेय प्रोसेसिंग, पॅकेजिंग, मार्केटिंगपर्यंतचे काम.
बातम्या आणखी आहेत...