आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Successfull Operation On Heart In Jodhpur, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयाला पाच कप्पे असलेल्या देवराम यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - मानवी हृदयाला चार कप्पे असतात. मात्र, ४२ वर्षीय पाली देवराम यांच्या हृदयाला पाच कप्पे होते. त्यांना श्वसन, हृदयात दुखत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. देशातील अशा प्रकारची ही पहिली व जगातील तिसरी केस आहे. येथील मेडिप्लस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हृदयविकार तज्ज्ञ आलोक मदान व त्यांच्या टीमने अनेक टेस्टनंतर समस्येचे निदान केले.
पाचव्या कप्प्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येत होता. बुधवारी डॉक्टर्सच्या टीमने चार तास शस्त्रक्रिया केली. देवराम यांच्या हृदयातील अतिरिक्त पडदा (झडप) या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. चीन व जर्मनीनंतर अशा प्रकारची शस्त्रक्रिया भारतात यशस्वी झाली.