आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर पाकिस्‍तानला वेगळे पाडणार, सरकारचा निर्णय, मोदींनी घेतली बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्‍लीत पाकिस्‍तान विरोधात आंदोलन केले गेले. - Divya Marathi
दिल्‍लीत पाकिस्‍तान विरोधात आंदोलन केले गेले.

नवी दिल्‍ली - उरी येथील लष्‍कराच्‍या तळावर झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर दिल्‍लीमध्‍ये उच्‍चस्‍तरावर बैठकावर बैठका झाल्‍या. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक घेतली. त्‍या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथ, काही मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्‍ये पाकिस्‍तानला आंतरराष्‍ट्रीय पातळीवर एकटे पाडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.
आणखी एक जवान शहीद, यवतमाळचे विकास जनार्दन यांना वीरमरण
नियंत्रण रेषा आेलांडून भारतात घुसलेल्या चार पाकिस्तानी अतिरेक्यांनी रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या एका छावणीवर केलेल्या भीषण हल्ल्यातील आणखी जखमी जवान आज (सोमवार) उपचारादरम्‍यान शहीद झाला असून, आता हतात्‍मा झालेल्‍या जवानांची संख्‍या 18 वर गेली आहे. आज यवतमाळच्‍या विकास जनार्दन यांना उपचारादरम्‍यान वीरमरण आले. परिणामी, शहिदांंमध्ये महाराष्‍ट्रातील चार सुपूत्रांचा समावेश झाला आहे.
लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे, शिपाई संदीप सोमनाथ ठोक आणि शिपाई जानराव उईके अशी या शहीदांंची नावे आहेत. लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे साताऱ्यातील जाशीचे आहेत, तर संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खंडनगळीचे होते. जानराव उईके अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते. तीनही शहीद जवानांचेे पार्थिव पुण्यात पाठवले जाणार आहे. तेथूून तेे त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहे.
150 घरात पेटली नाही चूल..
सुभेदार करनैल सिंह शहीद झाल्याचे वृत्त शिबु चक गावात (जम्मू-काश्मीर) रात्री उशीरा समजले. सोमवारी सकाळी गावातील 150 घरांमध्ये चूल पेटली नाही. शहीद झालेल्या जवानांमध्ये सर्वाधिक 15 जवान हे बिहार रेजीमेंटचे होते. चार जवान इतके होरपळे होते की, त्यांची ओळख पटवण्यात मोठी समस्या निर्माण झाली होती.

शहीदांमध्ये दोन 2 डोगरा रेजीमेंटचे...
सुभेदार करनैल सिंह (शिबु चक गाव, जम्मू-काश्मीर)- 10 डोगरा रेजीमेंट
- हल्ला होण्यापूर्वी करनैल सिंह यांनी कुटुंबियांशी संवाद साधला होता. त्यांची पठाणकोट येथे बदली झाली होती. पुढील महिन्यात ते आपल्या यूनिटसोबत उरीहून पठाणकोटला रवाना होणार होते. विशेष म्हणजे त्यांची सुट्टी मंजूर झाली होती. या काळात ते घरी येणार होते. करनैल यांना तीन मुले आहेत.

हवलदार रवी पाल (सांबा, जम्मू-काश्मीर) - 10 डोगरा रेजीमेंट
- शहीद रवी पाल यांंचे धाकटे बंंधू देखील लष्कारात कार्यरत आहे. रवि यांना दोन मुले आहेत.
- रवी पाल यांचे थोरले बंंधू जोगिंदर पाल यांंनी म्हटले की, ''मी पंतप्रधानांंना आवाहन करतो की, आता खूप झाले. शत्रूकडून काही शिकणार आहेत की नाही?

11 शहीद बिहार रेजीमेंटचे..
शिपाई राकेश सिंह (बिहार)
शिपाई जावरा मुंडा (झारखंड)
शिपाई नाइमन कुंजर (झारखंड)
शिपाई जनराव उइके (महाराष्ट्र)
हवलदार एनएस रावत (राजस्थान)
शिपाई गणेश शंकर (यूपी)
नायक एसके विद्यार्थी (बिहार)
शिपाई विश्वजीत गोरहाई (बंगाल)
लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे (महाराष्ट्र)
शिपाई जी दलाई (बंगाल)
लान्स नायक आरके यादव (यूपी)

6 बिहार रेजीमेंटच्या चार जवान शहीद
शिपाई हरिंदर यादव (यूपी)
शिपाई टी संदीप सोमनाथ (महाराष्ट्र)
हवलदार अशोक कुमार सिंह (बिहार)
शिपाई राजेश कुमार सिंह (यूपी)

हे जवान झाले जखमी...
- बिहार रेजीमेंट:
व्ही.के गिरी, राम स्वरूप जाट, हरम सिंह, एसके ओरांव, बीजी सरकार, सुनील कुमार, सीएनके चंद्रमणी, रामदेव, शाम लाल, मुन्ना सिंह, सतीश कौशिक, बीजी बारिल

- डोगरा रेजीमेंट:
मंजीत सिंह, विनय कुमार, जसवंत सिंह, कमल कांत और सतीश कुमार.

कॅम्पमध्ये होते 3500 ते 4000 जवान आणि अधिकारी...
- हल्ला झाला तेव्हा कॅम्पमध्ये 3500 ते 4000 जवान उपस्थित होते. लष्कराचे लंगरचे काम रात्री 2.30 वाजता सुरु होते. स्वयंंपाकी व इतर जवान भोजन बनवण्याच्या कामात मग्न होते. तर काही जवान ड्युटी करून विश्रांंती घेत होते.

14 जवानांंचा होळपळून मृत्यू...
हल्ला झाला त्यावेळी तंबूत झोपलेल्या 14 जवानांचा जळून मृत्यू झाला, तर 20 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या वेळी भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत चारही अतिरेकी मारले गेले. लष्करी छावणीपासून सुमारे सहा किमी दूर असलेल्या सलामाबाद नाला भागातून हे अतिरेकी भारतात दाखल झाले होते.

लष्करी जवानांवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला
काश्मीरमध्ये 26 वर्षांपूर्वी दहशतवादी कारवाया सुरू झाल्या. या काळात लष्करी जवानांवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. २५९ दिवसांपूर्वी पठाणकोट विमानतळावर जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेने असाच हल्ला केला होता. तेव्हा ७ जवान शहीद झाले होते. या वेळी पण याच संघटनेच्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला. अतिरेक्यांकडून पाकिस्तानी बनावटीच्या साहित्यासह ४ एके-४७, ४ अंडर बॅरेल ग्रेनेड लाँचर आणि प्रचंड दारूगोळा होता.

इशाऱ्याकडे दुर्लक्ष
काश्मीरमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाकची गुप्तहेर संस्था आयएसआय व दहशतवादी गट मोठा हल्ला करू शकतात, अशी शंका भारतीय गुप्तहेर खात्याला होती. ईदच्या काळात इशाराही देण्यात आला होता. यानंतर दोन वेळा असा इशारा देण्यात आला. कडक बंदोबस्त व सतर्कतेमुळे हे हल्ले टळले. मात्र, नंतरच्या काळात इशाऱ्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही.

दोषींना अभय नाही...
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर ट्विट करून दोषींना अभय दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग पण श्रीनगरमध्ये दाखल झाले. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेतली.

हिंसाचार, निदर्शनांमुळे दुर्लक्ष
काश्मीर खोऱ्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे दहशतवादविरोधी व घुसखोरीविरोधी पथकाचे काम जवळपास ठप्पच झालेले होते. अतिरेकी जर ताबा रेषेवरून निसटले तर काश्मीरमधील तणावाच्या स्थितीत त्यांना पकडणे पण कठीण होते.

आतील माहिती फुटल्याची शक्यता
हल्ल्याच्या वेळी १०-डोगरा रेजिमेंटच्या जवानांची जागा ६-बिहार रेजिमेंटचे जवान घेत होते. या वेळी डोगरा रेजिमेंटचे काही जवान तंबूत झोपलेले होते. नेमकी ड्यूटी बदलाची ही वेळ अतिरेक्यांना माहिती असावी, अशीही शंका आहे.

पाकला सडेताेड उत्तर देऊ : भामरे
नाशिक- उरी येथील हल्ला पाकपुरस्कृतच असून या हल्ल्यास सडेताेड उत्तर दिले जाईल, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी सांगितले. नाशकात असलेले डॉ. भामरे तातडीने दिल्लीला रवाना झाले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...