आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी झोपेच्या गोळ्या, मग सल्फास, नंतर दोन वेळा रेल्वेपुढे झोपला...तरीही वाचला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंडौन सिटी (राजस्थान) - नियतीच्या मनात नसेल तर मृत्यूही येत नाही, याचा प्रत्यय नुकताच राजस्थानातील एका तरुणाला आला आहे. कौटुंबिक कटकटींना वैतागून एका तरुणाने रविवारी एका तासात तब्बल चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, चारही वेळेस त्याला काही 'यश' आले नाही. सरतेशेवटी दोन मुलींचा पिता असलेल्या या तरुणाला आपल्या घोडचुकीचा पश्चात्ताप झाला अन् त्याने मनातून आत्महत्येचा विचार काढून टाकला.

राजस्थानातील हिंडौन शहरात ही घटना घडली. एका नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय असलेल्या गोपालचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, त्याच्या दारूडेपणामुळे रोज घरात कटकटी होत होत्या. त्याला वैतागून त्याने आयुष्याचा अंतच करण्याचे ठरवले. मात्र येथेही त्याचे दैव आडवे आले. चारही घटनांतून सहीसलामतपणे वाचला आहे.

त्याबाबत डॉक्टर म्हणाले, गोपालने सल्फासच्या नव्या गोळ्या खाल्ल्या असतील. कारण आधी मिळणा-या गोळ्या नव्यापेक्षा अधिक धोकादायक असत. आता गोपालची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याला एक-दोन दिवसांसाठी निगराणीखाली ठेवले जाणार आहे. यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात येईल.

मृत्यूचे चार वार झाले बेकार
1. सर्वात आधी त्याने झोपेच्या ब-याच गोळ्या एकाच वेळी घेतल्या. मात्र, त्यांचा काहीही परिणाम झाला नाही.
2. यानंतर त्याने गंधकयुक्त विषारी औषध (सल्फास) घेतले. मात्र, त्याचाही काहीच परिणाम झाला नाही.
3. यामुळे त्याने रेल्वेपुढे आत्महत्या करण्याचे ठरवले. तो रेल्वे रुळांवर जाऊन झोपला. रेल्वे आली, मात्र त्याचा वेग कमी असल्याने चालकाने रेल्वे थांबवून त्याला दुस-या ठिकाणी झोपवले.
4. यामुळे वैतागलेला दुस-या रुळांवर जाऊन आडवा झाला. येथेही एक रेल्वे येत होती. मात्र, योगायोगाने तिला सिग्नल मिळालेला नव्हता. यामुळे ती काही अंतरावरच थांबली. रेल्वेचालकाने रुळांवर एक व्यक्ती झोपल्याची सूचना स्टेशन मास्तरांना दिली. त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी गोपालला उचलून रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला जयपूरला हलवण्यात आले.

म्हणे, कुणी तरी वाचवेल याची खात्री होती
रुग्णालयात म्हणाला, आपण चुकून सल्फास व झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. यानंतर आपण रेल्वे रुळांच्या दिशेने गेलो. तेथे मद्यप्राशन केले. पुन्हा रेल्वे रुळांवर बसलो. कुणी ना कुणी वाचवेलच, अशी खात्री होती. आपल्याकडून मोठी चूक झाली आहे, आता यापुढे असा उपद्व्याप करणार नाही, असे गोपालने सांगितले.