आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंगेर (बिहार) - जमालपूर- किऊल रेल्वे ट्रॅकवर दौलतपूरजवळ एका तरुणीने रेल्वेखाली कटून जीव दिला. प्रेमप्रकरणातून तिने पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जमालपूर जीआरपीएफने डेडबॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे. प्राप्त माहितीनुसार, मुलगी कैमुर जिल्ह्याच्या भभुआची राहणारी आहे. ती तिच्या प्रियकराला भेटायला जमालपूर बीएमपी 9 मध्ये गेली होती.
घटनास्थळी आढळले हे सामान
- पोलिसांना घटनास्थळी लव्ह लेटर, प्रियकराचा फोटो आणि इतर सामान मिळाले. याआधारे शोध घेतला जात आहे.
- 25 वर्षीय अर्चना तिचा प्रियकर प्रदीप ऊर्फ अनुज सिंहला भेटायला जमालपूरला गेली होती.
- पोलिसांना घटनास्थळी एसपींच्या नावे एक तक्रार पत्रही आढळले. पत्रात अर्चनाने एसपींच्या नावे लिहिले की, सहा वर्षांपासून तिचे प्रदीपशी अफेअर सुरू होते.
-दरम्यान, प्रियकराला पोलिसांत नोकरी लागली. त्याची नियुक्ती सुपौल जिल्ह्यात शिपाई पदावर झाली. नोकरी लागल्यानंतर त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला.
लग्नासाठी मागितले 5 लाख रुपये आणि बोलेरो
- मुलीने पत्रात लिहिले आहे की, प्रियकराने लग्नासाठी हुंडा म्हणून 5 लाख रुपये आणि एक बोलेरोची मागणी केली होती.
- पत्रात हेही लिहिले होते की, लग्न मोडण्यामागे त्याच्या मामाची मुलगी आणि दिराचा हात आहे.
- तिने पत्रात प्रियकर प्रदीप कुमारसह इतरांचे मोबाइल नंबर दिले आहेत. पोलिसांनी जवानाला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे.
- सोबत मुलीच्या नातेवाइकांनाही माहिती देण्यात आली आहे. ते आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.