आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suicide In Rally, Police Lodge Complaint Against AAP Leaders

\'आप\'मुळे गजेंद्रची अात्महत्या, दिल्लीत \'आप\'चे नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजस्थानचा शेतकरी गजेंद्रसिंहने दिल्लीतील जंतर-मंतरवर केलेल्या आत्महत्येचा गंुता वाढत चालला आहे. गजेंद्रला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिल्ली पोलिसांनी आम आदमी पार्टीचे (आप) नेते व कार्यकर्त्यांवर दाखल केला आहे. दरम्यान गजेंद्रच्या कुटुंबीयांनीही केजरीवाल यांच्यामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.
फोटो - दिल्लीत भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आंदोलन केले.

गजेंद्र झाडावर चढला तेव्हा आपचे नेते व कार्यकर्ते टाळ्या वाजवत होते. काही लोकांनी व्यासपीठावर बसलेल्या लोकांचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला; परंतु टाळ्या बंद झाल्या नाहीत. त्यामुळे चिडलेल्या गजेंद्रने गळफास घेतला, असे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्याचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर केला आहे. गजेंद्र झाडावर चढत होता तेव्हा आपचे कार्यकर्ते टाळ्या वाजवत होते, आरडाओरड करत होते. अशा वेळी आत्महत्या करणा-याशी बोलले जाते, त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु लोक घोषणाबाजी आणि त्याला उचकवत राहिले, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले. मात्र राजनाथ सिंह खोटे बोलत आहेत. दिशाभूल करणारे वक्तव्य करत आहेत. आपच्या विरोधात दिल्ली पोलिसांचा वापर करून घेण्याचा हा केंद्र सरकारचा कट आहे, असे आपचे प्रवक्ते संजय सिंह यांनी म्हटले आहे.
कुटुंबीयांचाही केजरीवालांवर आरोप, पोलिसांवरही रोष
आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी जंतरमंतरवर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या वेळी सर्वांसमोर झाडावर गळफास घेऊन आत्महत्या करणा-या गजेंद्रसिंह राजावत या तरुण शेतक-याच्या मृत्यूस ‘आप’ व दिल्ली प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मृत शेतक-याच्या कुटुंबीयांनी केला.
गजेंद्रसिंह यांचे आजोबा गिरधरसिंह यांनी पोलिसांनाही जबाबदार धरले. ते म्हणाले, गजेंद्रसिंहने झाडावर गळफास घेतला तेव्हा आपच्या कार्यकर्त्यांनी अथवा पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही? पोलिसांनी अग्निशमन दलास हा प्रकार का कळवला नाही? गजंेद्रला तत्काळ झाडावरून खाली उतरवले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते. केंद्र सरकारने मांडलेल्या भूसंपादन विधेयकावरून गजेंद्रसिंह नाराज होते. त्यांचे विचार अत्यंत सकारात्मक होेते. आत्महत्येचा विचार ते करतील, असे कधीच वाटले नव्हते. या स्थितीत पोलिस आणि नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर ते नक्कीच वाचले असते, असे त्यांचे मेहुणे सुरेंद्रसिंह यांनी म्हटले आहे.

गावी अंत्यसंस्कार
गजेंद्रसिंह यांच्यावर गुरुवारी त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी स्थानिक लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. गजेंद्रसिंह यांनी यापूर्वी २००८ आणि २०१३ मध्ये समाजवादी पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. गजेंद्र यांच्या मृत्यूनंतर दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे.

‘ती’ चिठ्ठीही बनावट?
गजेंद्रसिंह यांच्या खिशात सापडलेली सुसाइड नोट त्यांच्या हस्ताक्षरात नसल्याचा दावा त्यांच्या बहिणीने केला आहे. गजेंद्र यांचा दुसरा एक भाऊ शामसिंह याने असा दावा केला आहे की, आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी गजेंद्र यांना फोन करून चर्चेसाठी बोलावले होते.

हत्येला अरविंद केजरीवालच जबाबदार
आत्महत्येवरून दिल्लीत राजकारण सुरू असतानाच गजेंद्रच्या पार्थिवावर त्याच्या झामरवाडा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्याला सुसाइड नोट म्हटले जात आहे, त्यातील हस्ताक्षर गजेंद्रचे नाहीच. गजेंद्रच्या हत्येला केजरीवालच जबाबदार आहेत, असा आरोप गजेंद्रच्या बहिणीने केला आहे. गजेंद्र आपचे नेते मनीष शिसोदिया यांच्या संपर्कात होता. त्यांनीच त्याला बोलावले होते, असे गजेंद्रचा भाऊ विजेंद्रने म्हटले आहे.

घटनात्मक पेच
दिल्ली सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या चौकशीला सामोरे जाणार नसल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे.

मला टीव्हीवर पाहा, फोनवर गजेंद्र यांनी बहिणीस सांगितले
११.१५ वाजता - गजेंद्रने आपल्या भावाला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही.
११.३० वाजता - भावाने उत्तरादाखल फोन केला तेव्हा त्याला गजेंद्रने टीव्ही बघण्यास सांगितले.
१.१५ वाजता - गजेंद्रने बहिणीला फोन केला आणि म्हणाला- मला टीव्हीवर पाहा. सभेवरून मी परतल्यानंतर आपण फर्निचर खरेदी करू.