आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारमधील मंत्र्याला बलात्काराच्या जुन्या प्रकरणात जयपूर कोर्टाची नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - केंद्रीय रसायन आणि खते मंत्री निहालचंद मेघवाल यांना बलात्काराच्या एका जुन्या प्रकरणात नोटीस जारी करण्यात आली आहे. जयपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. हरियाणा येथील एका विवाहितेसोबतच्या दुष्कर्म प्रकरणात केंद्रीय मंत्र्यासह सहायक पोलिस आयुक्त अनिल राव आणि 16 जणांना समन्स बजावण्यात आले आहे. पीडितेने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने आज हे आदेश दिले आहेत. पोलिसांनी कोर्टात अंतिम अहवाल दाखल करून हे प्रकरण रद्दबातल ठरविले होते. त्याविरोधात पीडितेने याचिका दाखल केली होती.
काय आहे प्रकरण
पीडितेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, की ती हरियाणा येथील अबूब येथील रहिवासी आहे. 20 डिसेंबर 2010 मध्ये तिचा विवाह ओमप्रकाशसोबत झाला. फेब्रुवारी 2011 मध्ये तिच्या पतीने तिला जयपूरला आणले. तिथे तो तिच्या जेवणात गुंगीचे औषध मिळवत होता, त्यामुळे ती बेशुद्ध होत होती आणि त्या अवस्थेत तिच्यासोबत दुष्कर्म केले जात होते.
एक दिवस तिने जेवण केल्याचे नाटक केले आणि त्यानंतर तिथे तिचा दीर आला व त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली. याची तक्रार तिने पतीकडे केली. तेव्हा त्याने स्पष्ट सांगितले की, माझी राजकीय महात्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी तुझा वापर करीत आहे.
महिलेचा आरोप आहे, पती वेळोवेळी गुंगीचे औषध देऊन तिला दुस-या आरोपींच्या हवाली करीत होता आणि ते तिच्यासोबत दुष्कर्म करीत होते. तिच्या पतीने तिची सीडी देखील बनवली आहे. तो तिला जयपूरच्या मानसरोवर हॉटेल, मुस्कान पॅलेस येथे ठेवत होता.