आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरण : पोस्ट मॉर्टम रिपोर्ट बदलासाठीच्या दबावाचे वृत्त एम्सने फेटाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी एका डॉक्टरने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एम्स हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने आज (बुधवार) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन रिपोर्ट बदलण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचा खुलासा केला गेला आहे.

काय आहे प्रकरण
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू प्रकरणी एक नवा खुलासा झाला आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद आणि शशी थरूर यांच्या दबाबात चुकीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला होता, असा दावा एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणी एम्सच्या डायरेक्टरकडून अहवाल मागवला आहे.
प्रकरण मिटवण्यासाठी दबाव
सुनंदा यांचे पोस्टमॉर्टम करणा-या डॉक्टरांच्या टीमचे प्रमुख असलेल्या गुप्ता यांनी सेंट्रल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिव्यूनल (कॅट) मध्ये यासंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रकरण मिटवण्यासाठी आझाद यांनी त्यांच्यावर अव्यवहारिकपणे काम करण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाले आरोग्यमंत्री?
केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, त्यांच्या मंत्री बनल्यानंतर डॉ. सुधीर गुप्ता यांनी प्रमोशनसाठी त्यांना पत्र लिहिले होते. पण टिव्हीवर त्यांच्यावर काही विशेष आरोप लावण्यात आल्यानंतर आम्ही एम्सच्या डायरेक्टरकडून अहवाल मागवला आहे.

काय आहे प्रतिज्ञापत्रात?
एका वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या वृत्तामध्ये डॉ. गुप्ता यांच्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देण्यात आला आहे. या प्रतिज्ञापत्रात गुप्ता म्हणाले आहेत की, आझाद आणि थरूर अत्यंत शक्तीशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना त्यावेळे मोकळेपणाने आपले म्हणणे मांडता आले नाही. डॉ. गुप्ता यांनी त्यांच्या दाव्याच्या समर्थनासाठी एम्सचे डायरेक्टर आणि थरूर यांच्यात झालेल्या ई मेलवरील चर्चेची माहितीही दिली आहे. मात्र, गुप्ता यांच्या विरोधातच पदाचा गैरवापर आणि चोरीचा आरोप लागत आहे.
गूढरित्या झाला होता सुनंदा यांचा मृत्यू
जानेवारी महिन्यात सुनंदा यांचा मृतदेस संशयास्पद परिस्थितीमध्ये दिल्लीत्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आढळून आला होता. त्याच्या आधीच ट्वीटरवर त्यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांच्याशी भांडण झाले होते. मेहर आणि सुनंदा यांचे पती थरूर यांच्यात अफेयर असल्याचा संशय सुनंदा यांना होता. मात्र, मेहर तरार यांनी हे आरोप फेटाळले होते. सुनंदा यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तणाव कमी करण्याचे औषध अधिक प्रमाणात घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, लाळेची तपासणी केली त्याच्या रिपोर्टमध्ये मात्र असे काही आढळले नव्हते. त्यामुळेच मार्चपर्यंत एम्सचे डॉक्टर फॉरेंसिक तज्ज्ञांच्या प्रश्नांची उत्तरे मागत होते. अखेरच्या रिपोर्टमध्ये मृत्यू नैसर्गिक असून तौ अनैसर्गिक परिस्थितीत झाल्याचे म्हटले होते. अशा परस्परविरोधी रिपोर्टमुळे या प्रकरणातील गुंता अधिक वाढला आहे.
फाइल फोटो - सुनंदा व शशी थरूर