आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone\'s Nude Photo On Hyderabad Municipal Website

हैदराबाद महानगर पालिकेच्या वेबसाइटवर झळकले सनी लिओनचे \'तसले\' फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदाराबाद - ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेतील सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांची 48 तास एकच धावपळ सुरु होती, ती म्हणजे पालिकेच्या वेबसाइटवरील बेबी डॉल सनी लिओनचे न्यूड फोटो काढून टाकण्यासाठी. पोर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली बेबी डॉल सनी लिओनचे न्यूड फोटो सोमवारी पालिकेच्या अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर झळकले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर 48 तासांनंतर 'ते' फोटो काढून टाकण्यात तांत्रिक विभागाला यश आले, आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

मीडिया रिपोर्टनुसार, ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेचे आयुक्त बी जनार्धन रेड्डी म्हणाले, सोमवारी पालिकेच्या कचरा गोळा करण्याच्या घंटागाडीची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रिअल टाईम साईटवर फोटो दिसायला लागले होते. याची माहिती मिळताच तत्काळ तांत्रिक विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली.

तांत्रिक विभागाने सायंकाळपर्यंत मोठ्या कष्टाने होमपेजवरील सनीचा 'तसला' फोटो काढला आणि त्यांना हायसे वाटते ना वाटते तोच वेबसाइटच्या सर्व सेक्शनमध्ये सनीचे 'ते' फोटो झळकू लागले. यामुळे आणखीच डोकेदुखी वाढली.

वेबसाइटच्या सर्व पेजवर आलेले सनीचे 'ते' फोटो काढण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची टीम कामाला लागली होती, मात्र त्यांना त्यात लवकर यश आले नाही. यामुळे पालिकेची नालस्ती व्हायची ती झालीच. तांत्रिक कर्मचाऱ्यांनी अखेर 48 तासांनतर ते फोटो काढले.
मीडिया रिपोर्टनुसार, रेड्डी म्हणाले, पालिकेने दोन वर्षांपूर्वी ऑफसाइट रिअल टाइम मॉनिटरिंग सिस्टिम (OSRT) बंद केली होती. परंतू सोमवारी त्यावर सनीचे फोटो कसे झळकले याची चौकशी केली जाणार आहे.
कोण पाहाते ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या वेबासाइटचे काम ...