आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRH vs RPS: चुरशीच्‍या लढतीत हैदराबादचा पराभव, पुणे 12 धावांनी विजची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेन स्‍टोक्‍सने पाचव्‍या षटकांत शिखर धवन आणि केन विलियम्‍सन यांना आऊट केले. - Divya Marathi
बेन स्‍टोक्‍सने पाचव्‍या षटकांत शिखर धवन आणि केन विलियम्‍सन यांना आऊट केले.
हैदराबाद - शेवटच्‍या चेंडूपर्यंत उत्‍कंठावर्धक ठरलेल्‍या सामन्‍यात राइझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने हैदराबाद सनरायजर्सचा 12 धावांनी पराभव केला. हैदराबादच्‍या संघाने विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्‍न केले. मात्र 149 धावांचा पाठलाग करताना 20 षटकांत त्‍यांना 136 धावाच काढता आल्‍या.
 
पहिल्‍या इंनिगमध्‍ये पुण्याने 20 षटकांत 8 गडी गमावून 148 धावा केल्‍या. हैदराबादसाठी सिद्धार्थ कौल याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्‍यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्‍या हैदराबादच्‍या संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 136 धावा केल्‍या. 
 
अशा पडल्या पुण्याच्या विकेट्स...
- टॉस हारून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पुण्याची सुरुवात मंद राहिली. दुसऱ्या ओव्हरमध्येच पुण्याने पहिला गडी गमावला. राहुल त्रिपाठी 1 धाव काढून रन आऊट झाला. 
- पुण्याला दुसरा दणका सातव्या ओव्हरमध्ये बसला. संघाच्या 39 धावा झाल्या असतानाच बिपुल शर्माच्या चेंडूवर अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. त्याने चेंडूंवर केवळ 22 धावा काढल्या. 
- पंधराव्या ओव्हरमध्ये राशिदने बेन स्टोक्सचा बळी घेतला. स्टोक्सने 25 चेंडूंवर तब्बल 39 धावा काढल्या. 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे.
 
राइजिंग पुणे सुपरजायंट्सचे प्लेइंग इलेव्हन
- अजिंक्य रहाणे, राहुल त्रिपाठी, स्टीव स्मिथ, मनोज तिवारी, बेन स्टोक्स, एमएस धोनी, डेन ख्रिश्चियन, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट आणि इमरान ताहिर.
 
सनराइजर्स हैदराबाद-
डेविड वॉर्नर, शिखर धवन, केन विलियम्सन, युवराज सिंह, एम. हेनरिक्स, नमन ओझा, बिपुल शर्मा, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, सिद्धार्थ कौल आणि आशीष नेहरा.
 
बातम्या आणखी आहेत...