आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Super Star गाय @करनाल;एका गायीने बनविले लखपती, वाचा दररोज देते किती दूध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूध काढण्यासाठी मशिनचा वापर करावा लागतो. - Divya Marathi
दूध काढण्यासाठी मशिनचा वापर करावा लागतो.
करनाल (पंजाब) - भारत हा कृषीवर आधारित देश आहे. कृषीला पशुपालनाची जोड असेल तर शेतकऱ्याला फायदाच होतो. मंगळवारी जागतिक पशुपालन दिवस साजरा झाला. या निमित्ताने divyamarathi.com अशा एका गायीबद्दल सांगणार आहे, ज्या गायीने शेतकऱ्याला लखपती बनविले आहे. ही गाय दिवसाला 60 लिटर दूध देते. सरासरी हिशेब केला तर तासाला अडीच लिटर दूध देणारी ही गाय आहे.

मशिनने काढले जाते दूध
- करनाल येथील दादुपूर गावातील डेअरी संचालक कुलदीप यांनी या गायीचे नाव जॅकब ठेवले आहे.
- 25 वर्षांचे कुलदीप त्यांचा पीढिजात व्यवसाय सांभाळत आहेत. ते म्हणाले की अजून या गायीची किंमत लावलेली नाही. कारण ती रोज एवढे दूध देते की फार मोठा फायदा होत आहे.
- दूध उत्पादन अधिक होत असल्यामुळे मशिनलावून दूध काढले जाते.
- या गायीने विविध स्पर्धांमध्ये आतापर्यंत 2 लाखांचे बक्षिस जिंकले आहे.
होल्सटीन फ्रोजन जातीची गाय, अमेरिकेतून केले होते सीमन
- कुलदीपसिंग यांचे म्हणणे आहे, की ही गाय होल्सटीन फ्रोजन जातीची आहे. अशा गायी हॉलेंड येथे आढळतात. याचे सीमन यूएसए येथून मागवण्यात आले होते.
- कुलदीप पाच वर्षांपासून या गायीचा सांभाळ करीत आहेत.
हिरवा चारा, फीड आणि हिरवा भाजीपाला
- 60 लिटर दूध देणाऱ्या गायीच्या चारा-पाण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
- या गायीला दररोज 30-35 किलो हिरवा चारा, 10 किलो फीड, 10 किलो गाजर आणि 5 किलो हरभरे लागतात.
- त्यासोबत मोसमी भाजीपाला दिला जातो.
तीन स्पर्धांमध्ये चॅम्पियन
- या गायीने 2015 मध्ये राष्ट्रीय डेअर संस्थाकडून आयोजित राष्ट्रीय पशू मेळावा आणि मुक्तसर पंजाब येथील पुरस्कार जिंकले आहेत.
- त्याआधी 2013 मध्ये झज्जर येथील स्पर्धा जिंकली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, एका गायीने बनवले लखपती
बातम्या आणखी आहेत...