आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superfast Express Leaves Four Coaches Behind In Bihar News In Divya Marathi

चार डबे मागेच, सुपरफास्ट रेल्वे गेली पुढे निघून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरभंगा - एखाद्या सुपरफास्ट रेल्वेचे काही डबे मागेच राहिले तर काय प्रसंग ओढवेल, याची कल्पनाच केलेली बरी. परंतु बिहारमध्ये असाच काहीसा प्रसंग पाहायला मिळाला.

शुक्रवारी सकाळी 8 वाजून 35 मिनिटाला दरभंगा-नवी दिल्ली संपर्क क्रांती सुपरफास्ट दरभंगा स्थानकातून बाहेर पडली आणि पावणेनऊच्या सुमारास ही गाडी लाहेरियासराई स्थानकावर पोहोचली. दरभंगा येथून निघाल्यानंतर बराचवेळ गाडीचे काही डबे मागे राहून गेल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यानंतर रेल्वे अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात आली. परंतु तोपर्यंत पुढचे स्थानक थलवाडा आले होते. येथे गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर गाडीचे डबे पुन्हा जोडण्यात दोन तासांचा वेळ गेला. तोपर्यंत प्रवाशांचा खोळंबा झाला होता.