आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टार रजनीकांत शूटिंगदरम्यान जखमी ; नीकटवर्तीय म्हणाले, लवकरच शुटिंगला परतणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजनीकांतच्या 2.0 या चित्रपटाचे टिझर नुकतेच लाँच करण्यात आले. त्यावेळी सलमानही उपस्थित होता. - Divya Marathi
रजनीकांतच्या 2.0 या चित्रपटाचे टिझर नुकतेच लाँच करण्यात आले. त्यावेळी सलमानही उपस्थित होता.
चेन्नई - 2.0 च्या शुटिंगदरम्यान सुपरस्टार रजनीकांत जखमी झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री उशीरा एका फाइट सीनचे शुटुंग सुरू असताना ते जखमी झाली. प्रोडक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार केलम्पकम प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्यानंतर काही तासांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. सध्या रजनीकांत 2.0 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत.

पायाला किरकोळ जखम..
- शनिवारी रात्री 8-9 च्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
- हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाली होती. अर्धा तासाच्या उपचारानंतर लगेचच त्यांना सुटी देऊन घरी पाठवण्यात आले.

# 400 कोटींचे बजेट
- 2.0 हा रजनीकांत यांच्या ‘एंधिरन’ चित्रपटाचा सिक्वल आहे. शंकर या चित्रपटाचे डायरेक्शन करत आहे.
- या चित्रपटाचे बजेट 400 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटात अॅमी जॅक्सन आणि अक्षय कुमार हेही आहेत.
- अक्षय कुमार प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत दिसून येत आहे. एका राक्षसाच्या भूमिकेत आपल्याला अक्षय दिसणार आहे. ‘द क्रो’ असे त्याचे नाव आहे.
# फर्स्ट लूकसाठी 5 कोटींचा खर्च
- या चित्रपटाचा टिझर नुकताच लाँच करण्यात आला होता. ए.आर.रेहमानने चित्रपटाचे संगीत दिले आहे.
- चित्रपटाचा फर्स्ट लूक मोठ्या सोहळ्यात लाँच करण्यात आला. त्यासाठी पाच कोटींचा खर्च करण्यात आला.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...