आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक मुलीला कन्या समजा : राजनाथ सिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - प्रत्येक मुलीला आपली कन्या समजावे. तसेच मुलीला दुसऱ्याचे धन मानने ही भावना बदलणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी
व्यक्त केले.

‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या विषयावर लखनऊ येथील मनीषा मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते आपल्या मतदारसंघात तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते. एनडीए सरकार मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष देत असल्याचा दावाही राजनाथ सिंह यांनी केला आहे. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार विविध प्रकारच्या उपाययोजना राबवत आहे. मुली दुसऱ्याचे धन नसून त्या परिवाराच्या उद्धारासाठी पुढाकार घेतात. त्यांना संस्कारित व शिक्षित करणे गरजेचे आहे. अनेक युवती आपल्या परिश्रमांनी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्रशासकीय अधिकारीपदापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. अंतरिक्षपर्यंत त्यांनी झेप घेतल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले.