आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयात याचिका करणेही महागणार, सुप्रीम कोर्टात 10 ते 50 पटींनी वाढली फीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात कायदेशीर लढाई लढणेही आता महाग झाले आहे. कोर्टांमध्ये फीसमध्ये 10 ते 50 पटींनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी यानी अब याचिका दाखिल करने के 50 रुपयांऐवजी 2,500 रु. फीस लागणार आहे.
फीस वाढवण्याबरोबरच मृत्यूदंडाच्या शिक्षांसंदर्भातही काही बदल करण्यात आले आहे. आता मृत्यूदंडाच्या संदर्भातील शिक्षा सुनावण्याचे काम दोनऐवजी तीन न्यायाधीशांचे पीठ करेल. 19 ऑगस्टपासून या नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. कोर्टात संविधानाच्या अनुच्छेद-32 अंतर्गत येणा-या याचिकेसाठी 500 रुपये शुल्क ठरवण्यात आले आहे. तर लिखित जबाब नोंदवण्यासाठी आता 500 रुपये लागणार आहेत. वकीलपत्र दाखल करण्यासाठी तीनऐवजी 10 हजार रुपये द्यावे लागतील. तर दोन रुपयांत सादर केल्या जाणा-या प्रतित्रापत्रांसाठी वीस रुपये लागतील.
ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत याचिकेसाठी 5,000 रुपये
ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत याचिकेअंतर्गत पूर्वी 250 रुपये शुल्क लागायचे. ते वाढवून 5,000 करण्यात आले आहे. निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी 20 ऐवजी 50 हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागेल.
(फाइल फोटोः सुप्रीम कोर्ट)
पुढे वाचा - सीए-सीएस वर का नाराज झाले वरीष्ठ न्यायालय