आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Notice To Governor And Central On The Issue About Vyapam,

व्यापमं भरती घोटाळा प्रकरणी मध्य प्रदेश राज्यपाल अन् केंद्राला कोर्टाची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) भरती घोटाळा प्रकरणात राज्यपाल रामनरेश यादव यांना पदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र आणि राज्यपालांना नोटीस जारी केली आहे. तीन आठवड्यांत सर्व संबंधित पक्षांना जबाब देण्याचे आदेशही बजावले आहेत.

सरन्यायाधीश एच. एल. दत्तू, न्यायमूर्ती शिवकीर्ती सिंह आणि न्यायमूर्ती अमिताव रॉय यांच्या न्यायपीठाने शुक्रवारी आरटीआय कार्यकर्ता संजय शुक्लाच्या याचिकेवर सुनावणी केली. शुक्ला यांनी आपल्या याचिकेत भ्रष्टाचाराचे आरोपी राज्यपालांना हटवण्यासाठी केंद्राला दिशानिर्देश तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. राज्यपालांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. घटनेचे कलम ३६१ अंतर्गत राज्यपालांना मिळालेल्या अधिकारांना आव्हान देणाऱ्या दाव्यांनाही न्यायालयाने स्वीकारले आहे. मध्य प्रदेश सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने वनरक्षक भरती घोटाळ्यात राज्यपालांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता.