आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावेरी पाणी वाद : तामिळनाडूला २ हजार क्युसेक पाणी देणे सुरू ठेवा : सुप्रीम कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कावेरी पाणी प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कर्नाटकला पुढील सुनावणीपर्यंत तमिळनाडूला दरदिवशी २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर दोन्ही राज्यांनी पाणी प्रश्नी शांतता राखण्यास बजावले आहे.

पाण्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या गदारोळाचाही न्यायालयाने कडक शब्दांत समाचार घेतला. लोकांनी स्वत:च कायदा तयार करू नये. ४ ऑक्टोबर रोजी कोर्टाने कर्नाटकला यासंदर्भात आदेश दिला होता. त्यानुसार कर्नाटक तमिळनाडूला दररोज २ हजार क्युसेक पाणी सोडत आहे, असे मंगळवारी सुनावणीदरम्यान नमूद करण्यात आले.

कावेरी पाण्यासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सोपवला आहे, असे न्यायालयासमोर सांगण्यात आले. त्यावर न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पिठ म्हणाले, आम्ही अगोदर २०१३ मध्ये लवादाच्या निवाड्यावर कर्नाटक, तमिळनाडू, केरळ व पुद्दुचेरीकडून दाखल याचिकेवर सुनावणी होणार किंवा नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर समितीच्या अहवालावर चर्चा ऐकून घेऊ. वास्तविक कर्नाटक व तमिळनाडू दोन्ही राज्यांना पाण्याच्या संकटाचा मुकाबला करावा लागत आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक अडचणी तसेच बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यावर बुधवारीही सुनावणी सुरू राहणार आहे.

तामिळनाडूत सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे रोको, धरणे
चेन्नई | तामिळनाडू राज्यातील शेतकरी आणि विरोधीपक्षीयांच्या मोठ्या प्रमाणातील कावेरी पाणीवाटप वादात कर्नाटकाच्या निषेधार्थ रेल्वे रोको आंदोलनामुळे (मास रेल्वे ब्लॉकेजेस) आज सलग दुसऱ्या दिवशीही राज्यातील ठीकठीकाणची परिस्थिती आंदोलनसदृश्य आहे. पोलीसांचा संशय तमिळ मनिला कॉंग्रेस नेते जी के वासन आणि साधारणत: ३०० शेतकरी धरणे धरली.
येथे इग्मोर रेल्वे स्टेशनावरील धरणे आंदोलनात एमडीएमके पक्षाचे महासचिव वायको आणि व्हीसीके प्रमुख थुल थिरुमयालयान यांच्यासह डाव्या पार्टीतीलही असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी एक्सप्रेस ट्रेनच ब्लॉक केली. यात पक्षातील दोन वरिष्ट नेते रेल्वेच्या इंजिनाच्या रेलिगवर चढले आणि विविध घोषणा दिल्या.

येथील मध्यवर्ती रेल्वेस्टेशनावर नाम तामिझर कच्छी नेते यांच्यासह सिमन त्यांच्या पाठीराख्यांसह धरणे रेल रोको केला. यामुळे पोलीसांनी त्यांना पकडून नेले. याचप्रकारे धरणे आंदोलन कावेरीच्या संगम वा त्रिभूज प्रदेश तिरुचिरापल्ली आणि तंजावूर जिल्ह्यातही झाली. मदुराईतही पोलीसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी सुरक्षा अडथळे बॅरीकडेस लावले होते.
बातम्या आणखी आहेत...