आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suraj Resolution Yatra : Vasundara Raje's Rath Yatra's Bus Like A Area Plane

सुराज संकल्प यात्रा : वसुंधरा राजे यांच्या रथ यात्रेसाठी बसमध्ये विमान सारखी सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची ‘सुराज संकल्प यात्रा’ 4 एप्रिलपासून सुरू होत आहे. या रथयात्रेसाठी दोन वातानुकूलित बस सज्ज करण्यात आल्या आहेत. एखादी आंतरराष्‍ट्रीय विमान सेवा कंपनी पुरवते, तशा सुविधा या रथामध्ये आहेत. एक रथ 12 मीटर, तर दुसरा रथ 7 मीटर लांबीचा आहे.


या रथातील आसने, लिफ्ट तसेच दरवाजांच्या हालचाली हायड्रोलिक यंत्रणेवर आधारित आहेत. मोठ्या रथात 8 मोठी आणि छोटी आसने आहेत. यात्रेदरम्यान वसुंधराराजेंना नागरिकांना संबोधित करायचे असल्यास रथाबाहेर पडण्याची गरज नाही. रथाच्या एका विशिष्ट कोप-यात उभे राहून एक बटन दाबताच, बसच्या छताचा काही भाग बाजूला सरकेल व मंचासह वसुंधराराजे बसच्या वर पोहोचतील, अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे.


हायटेक तंत्राचा वापर
सर्वार्थाने सुसज्ज या रथांमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदी यांच्या यापूर्र्वीच्या रथांपेक्षा वसुंधरांचे हे रथ सरस असल्याचे सांगण्यात येत आहे.