आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surat Crime Branch Arrested International ATM Hackers In Agra News In Marathi

SKYPEच्या मदतीने रशियातून हॅक होत आहेत देशातील ATM, 4.5 कोटींना चूना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- गुजरातमधील सुरत येथील पोलिसांनी सोमवारी आग्र्यातील एका फाइव्ह स्टार हॉटेलवर छापा टाकून एटीएम हॅकर्स गॅंगचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी नऊ हॅकर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक माहिती अशी की, देशातील एटीएम हॅक करणारा एक रशियन नागरिक आहे. तो रशियात बसून SKYPE च्या मदतीने देशातील बॅंकांचे एटीएम हॅक करत होता. हॅकर्सनी आतापर्यंत देशभरातील विविध बॅंकांना सुमारे 4.5 कोटी रुपयांचा चूना लावला आहे.

अनेक शहरात नेटवर्क
इंटरनॅशनल एटीएम हॅकर गॅंगचे उत्तर प्रदेशातील लखनौ, वाराणसी आणि गुजरातमधील सुरतसह देशात अनेक शहरात नेटवर्क आहे. हॅकर्सनी आतापर्यंत देशातील अनेक बॅंकांना चूना लावला आहे. एटीएम हॅक करून रकम काढली जाते. काढलेल्या रकमेतून 60 टक्के रकम हवालाद्वारा रशियात बसलेल्या म्होरक्यापर्यंत पोहोचवली जाते.

एटीएम हॅकर्स गॅंगमध्ये एकूण 15 सदस्य आहे. त्यापैकी नऊ जण जेरबंद असून सहा फरार आहेत. त्यात रशियन म्होरक्याचा समावेश आहे.
अशी व्हायची रशियातून हॅकिंग
आरोपी सुनील सिंहने सांगितले की, गँगमधील सर्व सदस्य Skypeच्या माध्यमातून कनेक्ट असायचे. चोरी करण्यासाठी गर्दी असलेल्या भागातील एटीएमची निवड केली जायची. चोरी करण्‍यापूर्वी रेकी केली जायची. नंतर सहा जण एटीएम कॅबिनमध्ये जाऊन एक क्रमांक टाकून बटण दाबायचे. एटीएमच्या स्‍क्रीनवर एक खास कोड दिसायचा.
एटीएमला डीकोड करून पाठवायचे 'Password'
Skypeवर रशियात बसलेल्या गँगचा म्होरक्या सर्व काही बघत असायचा. एटीएमच्या स्क्रीनवर आलेला कोडपासून गॅंगमधील सदस्यांना पुढील सूचना दिल्या जायच्या. थोड्या वेळात एटीएम डीकोड करून सदस्यांना पासवर्ड पाठवला जात असे. पासवर्ड टाकल्यानंतर एटीएमचे संपूर्ण कंट्रोल रशियात बसलेल्या चोरट्याकडे जायचे. त्यानंतर एटीएम उघडून उपस्थित सदस्य रुपये घेऊन फरार होत असत.
सुरतच्या क्राइम ब्रांचने केला पर्दाफाश
लखनौ, सुरत आणि मुंबईतील अनेक एटीएम हॅक झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर सुरत क्राइम ब्रांचने याप्रकरणी चौकशी सुरु केली. एटीएम फोडण्याचे तंत्र रशियन बसून हाताळले जात असल्याचे धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली.

आग्रा येथील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एटीएम हॅकर गॅंगमधील काही जण थांबले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सोमवारी रात्री उशीरा हॉटेलवर छापा टाकून नऊ जणांना अटक केली आहे.