आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Surendra Koli Will Get Capital Punishment On September 10 In Nithari Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निठारी कांड : आरोपी सुरेंद्र कोळीविरोधात डेथ वॉरंट, 10 सप्टेंबरला फाशी मिळण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - सुरेंद्र कोळी
गाझियाबाद - नोयडा येथील खळबळजनक निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोळीला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कोळीला 10 सप्टेंबरला फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी गाझियाबादच्या सीबीआई कोर्टाचे न्यायाधीश अतुल कुमार गुप्ता यांनी कोळीचे डेथ वॉरंट जारी केले. कोळीला फाशी देण्यासाठी तयारी करता यावी म्हणून, हे वॉरंट उत्तर प्रदेश सरकारकडे पाठवण्यात आले आहे.

कोळीला फाशी देण्यासाठी 10 सप्टेंबरची तारीख ठरवण्यात आली आहे, पण उत्तर प्रदेश सरकारबरोबर चर्चा केल्यानंतर यात बदल होऊ शकतो. कोर्टाने तुरुंग प्रशासनाला डेथ वॉरंटची सूचना कोळीच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. सुरेंद्र कोळी याला सीबीआय कोर्टाने 5 प्रकरणांमध्ये फाशी सुनावली होती. त्यानंतर कोळीने सुप्रीम कोर्ट, गृह मंत्रालय आणि राष्ट्रपतीकडे दया याचिका केली होती. पण कोळीच्या सर्व दया याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. कोळीला मेरठमध्ये फाशी दिली जाण्याची शक्यता आहे, कारण गाझियाबादच्या डासना तुरुंगात फाशी देण्याची व्यवस्था नाही.
2005 पासून निठारीमधून मुले बेपत्ता होत असल्याने नोयडा येथील निठारी चर्चेत आले होते. चौकशीमध्ये 29 डिसेंबर 2006 ला नोयडा पोलिसांनी डी-5 या कोठीमध्ये मुलांना मारण्यात आल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर कोठीचा मालक मोनिंदर सिंह पंढेर आणि नोकर सुरेंद्र कोळीला अटक करण्यात आली होती. कोठीमध्ये मुलांचे आणि एका तरुणीचे कपडे, चपला आणि सांगडे सापडले होते. नंतर सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली.