आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surface to air Akash Missile Successfully Test fired

‘आकाश’ क्षेपणास्त्राने हवेत साधला अचूक वेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालेश्वर - भारताने स्वदेशी बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्राची चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रावर चाचणी घेतली. शुक्रवारी त्याचे प्रायोगिक परीक्षण करण्यात आले. संरक्षण अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पायलटरहित विमान ‘लक्ष्य’च्या मदतीने उडणार्‍या वस्तूला उडवले. आगामी काही दिवसांत क्षेपणास्त्राच्या आणखी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. शुक्रवारी समुद्रातून एका निश्चित उंचीवरील पायलटरहित विमानाच्या मदतीने एका वस्तूला लक्ष्य केले. डीआरडीओतर्फे आकाशचा एकीकृत गाइडेड मिसाइल विकास कार्यक्रम राबवण्यात आला.

क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
25 किमी अंतरावरील लक्ष्यभेद करणे आणि 60 किलोग्रॅम शस्त्र सोबत घेऊन जाण्याची क्षमता
578 सेंटिमीटर लांबी
720 किलो वजन
अमेरिकेच्या क्षेपणास्त्राएवढे बलवान
लढाऊ विमाने, क्रूझ विमाने, हवेतून जमिनीवर हल्ला करणार्‍या क्षेपणास्त्रांसारखे लक्ष्याचा वेध घेणारे. क्षेपणास्त्राची तुलना अमेरिकेच्या जमिनीवरून हवेत लक्ष्य करणार्‍या एमआयएम-104 पॅट्रियट क्षेपणास्त्रासोबत केली जाते.
3000 आकाश क्षेपणास्त्र भारताकडे
2009 मध्ये पहिल्यांदा लष्करात वापर
यशस्वी > चांदीपूर एकीकृत चाचणी केंद्र, वेळ - सकाळी- 11.22, सहकार्य-पायलटरहित टार्गेट विमान ‘लक्ष्य’ने घेतला वेध