आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surge Of Punjabi origin Candidates Likely In Canada Polls

कॅनडात पंजाबी उमेदवार वाढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - कॅनडाच्या राजकारणात यंदा पंजाबींची शक्ती दुपटीने वाढेल. ३३० जागांसाठी ऑक्टोबरमध्ये होणार्‍या निवडणुकीत पंजाबी उमेदवारांची संख्या ५० पर्यंत जाऊ शकते. २०११ मधील निवडणुकीत २३ पंजाबी नागरिकांना तिकिटे मिळाली होती, तर यंदाही अनेक पंजाबी बहुल भागांत तिकिटे निश्चित झालेली नाहीत. अशा ८-१० जागांवर कंझर्व्हेटिव्ह, लिबरल एनडीपी या पक्षांनी पंजाबींना आश्वासने दिली असून मूळ बर्नालाचे कॅनडातील खासदार दविंदर यांच्या मते यंदा पंजाबी उमेदवार दुपटीने वाढतील.

या भागांत पंजाबींचे वर्चस्व
- कॅनडा इंडिया बिझनेस कौन्सिलचे माजी अध्यक्ष सरकार राणा, शिंदर पुरेवाल, दविंदर शौरी, दीपक ओबेरॉय, पॅम धनोआ, बिल संधू यांनाही तिकिटाची अपेक्षा.
- वँकोव्हरच्या न्यूटन-नॉर्थ डेल्टामध्ये मनी कौर जिन्नी सिम्स आमने-सामने आहेत. गेल्या वेळी जिन्नी यांनी विजय मिळवला होता.
- मिसीसागा-ब्रॅम्पटन साऊथ जागेवर तीन वेळा विजयी झालेल्या नवदीप बैस यांचा २०११ मध्ये पराभव झाला होता. त्यांना मिसीसागामधून पंजाबीचेच आव्हान आहे.
- ब्रेमलिया-गोर-मॉल्टन येथे लिबरल्सचे गुरबख्श मल्ही, कंझर्वेटिव्हचे बल गोसल एनडीपीचे जगमित धालीवाल प्रतिस्पर्धी आहेत.

गोर्‍यांची सद्दी संपणार सर्वेक्षणानुसार पंजाबींच्या विजयाची शक्यता वाढली
२००६मध्ये मूळ पंजाबी असलेले १० जण खासदार झाले. २००८ मध्ये तर २००११ मध्ये खासदार झाले. यंदा ही संख्या १५ पेक्षा अधिक होऊ शकते. सर्वेक्षणानुसार लिबरल्सना बहुमत मिळण्याची शक्यता असून हाच पक्ष पंजाबी लोकांना अधिक उमेदवारी देतो. ते १० जागांवर तीन मोठ्या पक्षांनी पंजाबी लोकांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे निवडून येणारा पंजाबीच असेल.