आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'शक्तिमान\'ला बसवला कृत्रिम पाय; अमानुष प्रहार करणार्‍या भाजप आमदाराला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहारडून- भाजप आमदाराने अमानुष मारहाण केल्याने पोलिसांचा घोडा 'शक्तिमान'ला अखेर एक पाय गमवावा लागला. गॅंगरीन पसरल्याने त्याचा पाय कापण्यात आला. चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर शक्तिमानला कृत्रिम पाय (प्रोस्थटिक लेग) बसवला. गुरुवारी ही शस्त्रक्रिया झाली. 'शक्तीमान' कृत्रिम पायावर उभा राहू शकला असला तरी तो धावू शकेल की नाही, या निष्कर्षावर डॉक्टर अद्याप पोहोचू शकले नाहीत.

शक्तिमानचे ऑपरेशन यशस्वी झाले. शक्तिमान 11 वर्षांपासून पोलिस सेवेत आहे. तो लवकरच चालू-फिरु शकेल, अशी अाशा असल्याचे एसएसपी सदानंद दाते यांनी सांगितले आहे.

भाजप आमदाराला अटक
दुसरीकडे, शक्तिमानला मारहाण करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप गणेश जोशी यांनी केला होताे. यावरून मसुरी येथे गणेश जोशीने समर्थकांसह आंदोलन केले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी घोडयावरुन आलेल्या पोलिसांवर जोशी व त्याच्या समर्थकांनी हल्ला चढवला. जोशींनी शक्तीमान घोड्या तोंडावर दांडुका मारला, नंतर त्याच्या पायावर प्रहार केला होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे प्रकरण? व पाहा 'शक्तिमान'चे फोटोज...