आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणासुदीत मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी, रावी नदीत सापडली पाकिस्तानी बोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवरात्राेत्सव, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘ड्रोन’च्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. उरी येथे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने ‘सर्जिकल स्ट्राइक्स’च्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरावर हवाई हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईची पोलिस यंत्रणा कमालीची सतर्क झाली अाहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ही कायम हायअलर्टवर असते. मात्र, गेल्या पंधरा दिवसात भारत- पाक सीमेवर घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येत आहे. मुंबईसारख्या अतिमहत्त्वाच्या शहरावर हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेता २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ड्रोन, रिमोट कंट्रोलद्वारे हाताळली जाणारी छोटी विमाने आणि पॅराग्लाईडींगवर बंदी घालण्यात आली त्याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी जारी केले असून या कालावधीत मुंबई परिसरात ड्रोन उडवणाऱ्यांवर कडक करावाई केली जाणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, पंजाबमधील रावी नदीत सापडली पाकिस्तानी बोट...
बातम्या आणखी आहेत...