आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surprise Check On Samjhauta Express Near Zero Line At Attari

समझौता एक्स्प्रेस उडवून देण्याची तालिबानची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - भारत पाकिस्तान दरम्यान चालणारी समझौता एक्स्प्रेस ट्रेन उडवून देण्याची धमकी मिळाल्याने पाकमधून आलेल्या या रेल्वेची भारतीय हद्दीत पूर्ण तपासणी करण्यात आली, परंतु त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. तालिबानी अतिरेकी बॉम्बद्वारे समझौता एक्स्प्रेस उडवून देण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली. त्यानंतर अटारी रेल्वे स्थानकानजवळ पाकमधून आलेल्या रेल्वेची तपासणी करण्यात आली.

सुमारे दीड तासाच्या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. नंतर ही रेल्वे पुढील प्रवासाला रवाना करण्यात आली. त्या वेळी पाकमधून आलेले ३५० प्रवासी त्यात होते. याआधी नोव्हेंबरमध्येही गाडी उडवून देण्याची धमकी मिळाली होती.