आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी उपमहापौरावर झाडल्या होत्या 67 गोळ्या; तब्बल सहा महिन्यांनी उघडतील अनेक राज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद (झारखंड)- माजी उपमहापौर नीरज सिंह यांच्या हत्याकांडात महत्त्वाची भूमिका असलेला आरोपी पंकज सिंह सुल्तानपुर कोर्टास (यूपी) शरण आला आहे. धनबाद पोलिस मागील काही महिन्यांपासून त्याच्या मागावर होते. 21 मार्च रोजी सायंकाळी नीरज सिंहसह चार जणांची निर्घृण हत्या करण्‍यात आली होती. पोस्टमार्टममध्ये नीरज सिंह याच्या मृतदेहात 67 गोळ्या आढळून आल्या होत्या.

पंकजला धनबादला आणण्याची शक्यता आहे. लिस कोर्टाकडे प्रोडक्शन वारंटची मागणी करू शकतात. पंकजच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- यूपी पोलिस आणि एसटीएफ पंकज सिंहच्या शोधात होते.
- पंकज हा यूपीमधील सुल्तानपुरच्या लंभुआ येथील रहिवासी आहे.
- पंकज हा पोलिसांना शरण आल्याच्या वृत्ताला एसएसपी मनोज रतन चोथे यांनी दुजोरा दिला आहे.

पंकज सिंह उघडू शकतो नीरज हत्याकांडातील अनेक राज!
- नीरज हत्याकांडाबाबतचे अनेक गुपीते पंकज आणि संतोष सिंहकडे असावेत, असा पोलिसांना संशय आहे.
- पोलिस या दोघांना मागील काही महिन्यांपासून शोध घेत होते.
- परंतु हत्याकांडानंतर दोघे फरार होते. पंकज पोलिसांना शरण आला आहे. त्यापाठोपाठ संतोष देखील सापडेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

कशी झाली होती नीरज सिंह यांची हत्या?
- धनबादचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे नेते नीरज सिंह यांच्यासह त्यांच्या तीन समर्थकांची 21 मार्चला सायंकाळी गोळ्या हत्या करण्‍यात आली होती.
- नीरज यांच्यावर हल्लेखोरांनी एकापाठोपाठ एक तब्बल 100 राउंड फायरिंग केले होते.
- समोरच्या सीटवर बसलेल्या नीरज यांच्या मृतदेहात 67 गोळ्या आढळल्या होत्या.
- दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडात नीरज यांच्यासह त्यांचा बॉडीगार्ड मुन्ना तिवारी, चालक घलटू आणि विश्वासू समर्थक अशोक यादव याचा जागेवरच मृत्यू झाला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... नीरज हत्याकांडाशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...