आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंचे पॅकेज धुडकावून जॉईन केली आर्मी, त्यापूर्वी होता फेमस मॉडेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक (हरियाणा)- सूर्य दहिया भारतीय लष्करात स्पेशल कमांडीक ऑफिसर आहे. त्याचे वडील नरेश दहिया आणि आजोबा नफेसिंह दहिया हेही लष्करात अधिकारी होते. त्यांनी दोन युद्ध लढले होते. विशेष म्हणजे सूर्यने लाखो रुपयांचे पॅकेज आणि मॉडेलिंग सोडून लष्करात अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. त्याने एमबीए केले आहे.
लष्कराकडून विदेशात जाण्याची संधी
- सूर्यला विदेशात चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली होती, अशी माहिती त्याच्या वडीलांनी दिली आहे.
- पण त्याने भारतीय लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. ट्र्रेनिंगमध्येच तो अव्वल राहिला आहे. पुढेही चांगली कामगिरी करेल.
- ट्रेनिंगमधील प्रत्येक बॅचच्या तीन कॅडेट्सना विदेशात आणखी ट्रेनिंगसाठी पाठवले जाते. सूर्यची निवड यात झाली होती. तो इंडोनेशियात गेला होता.
- 122 इंजिनिअर्स आयईजीटी भटिंडामध्ये सध्या सूर्य़ तैनात आहे. 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात कर्नल होशियारसिंग यांना परमविरचक्र मिळाले होते. सूर्यचे ते आदर्श आहेत.
मोबाईल कंपनीसाठी केली जाहिरात
- रोहतकमधील प्रतिष्ठित आयबी स्कूलमध्ये सूर्यचे शालेय शिक्षण झाले.
- त्यानंतर बहादुरगड येथील पीडीएम कॉलेजमधून बीटेक केले. कॅटमध्ये त्याला 90 प्लस मार्क मिळाले होते. त्यानंतर त्याने दिल्लीच्या फोर स्कूल ऑफि मॅनेजमेंटमधून एमबीए केले.
- यादरम्यान तो मॉडेलिंगही करत होता. त्याने एका मोबाईल कंपनीसाठी मॉडेलिंगही केले.
- एमबीए करत असताना फ्रान्सच्या एका कंपनीकडून लाखोंचे पॅकेजही मिळाले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मॉडेल आणि लष्करी अधिकारी सूर्य दहियाचे काही निवडक फोटो....
बातम्या आणखी आहेत...