आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushma Swaraj Attacks Pakistan On Ceasefire Violation

पाकिस्तानने गोळीबार थांबवावा, आमच्या बंदुकाही शांत होतील : सुषमा स्वराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : सांबा सेक्टरच्या एका गावात गोळीबारामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करताना गावकरी.
नवी दिल्ली - सीमेवर सुरू असलेल्या गोळीबाराच्या मुद्यावर भारताने पाकिस्तान खरे खोटे सुनावले आहे. पाकिस्तानी रेजर्सच्या मृत्यूसाठी भारत जबाबदार असल्याचा आरोप करत पाकिस्तानने भारतावर विश्वासघाताचा आरोप केला होता.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता कायम राहावी यासाठी ठरवलेल्या तंत्राचे पालन करण्याचा सल्लाही त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर सुरू असलेला गोळाबार थांबवला तर भारतही स्वसंरक्षणासाठी केला जाणारा गोळीबार थांबवणार असल्याचेही स्वराज यांनी म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र बाबींचे सल्लागार सरताज अजीज यांना पत्र लिहून तीव्र शब्दांत भूमिका मांडली आहे. 31 डिसेंबरला जम्मू परिसरात बीएसएफचा एक जवान गस्त घालत असताना पाकिस्तानच्या सीमेतील चौकीतून झालेल्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा एख जवान गंभीर जखमी झाला. त्यानंतर हा सर्व प्रकार सुरू झाल्याचे, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

भारताने कधीही हिरवा झेंडा दाखवला नाही, किंवा सीमेवर चर्चेची मागणी केली नसल्याचेही स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता टिकून राहावी यासाठी ठरवण्यात आलेल्या बाबींचे भारताने कायम पालन केले असल्याचे या पत्रात म्हणण्यात आले आहे. पाकिस्ताननेही त्याचा पालव करावा असे सुषमा स्वराज अजीज यांना म्हणाल्या आहेत.

त्याआधी सरताज अजीज यांनी भारताने विश्वासघात केल्याच आरोप केला होता. फ्लॅग मिटींग बोलावून पाकिस्तानी रेंजर्सला गोळ्या मारल्याचा आरोपही केला होता. तसेच एक दिवस आधीच अजीज यांनी 31 डिसेंबरला मारण्यात आलेल्या रेंजर्सच्या मृत्यू प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच त्याचा जोरदार विरोधही केला होता.
पुढे वाचा, चौदाशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवले...