आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या ट्रान्सफरसाठी ट्वीट, सुषमा म्हणाल्या- माझे मंत्रालय असते तर सस्पेंड केले असते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या ट्रान्सफरसाठी केलेल्या ट्वीटमुळे सुषमा स्वराज चांगल्याच रागावल्याचे पाहायला मिळाले. रागात ट्वीटला उत्तर देताना त्यांनी लिहिले, जर तुम्ही किंवा तुमची पत्नी माझ्या मिस्ट्रीत असता तर ट्वीटरवर अर्ज पाठवल्यामुळे तुम्हाला सस्पेंड केले असते. प्रकरण रेल्वे मंत्रालयाचे असल्याचे सुषमाने हे ट्वीट सुरेश प्रभूंना फॉरवर्ड केले. 

आमचा वनवास संपवा.. 
- सुषमा यांना ट्वीट करणारा स्मित राज पुण्यात एका आयटी कंपनीत काम करतो. 
- त्याने सुषमा यांनी ट्वीटरवर लिहिले, तुम्ही आमचा वनवास संपवायला मदत करू शकता का. माझी पत्नी झाशीमध्ये रेल्वे कर्मचारी आहे आणि मी पुण्यात काम करतो. आम्ही वर्षभरापासून दूर आहोत. 
- त्यावर सुषमा भडकल्या. त्यांनी उत्तर दिले की, जर तुम्ही किंवा तुमची पत्नी माझ्या मंत्रालयातील असले तर आतापर्यंत तुम्हाला सस्पेंड केले असते. 

प्रभूंना फॉरवर्ड केले ट्वीट... 
- नंतर सुषमा यांनी स्मित यांचे ट्वीट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना फॉरवर्ड केले. 
- त्यावर प्रभुंनी उत्तर दिले, सुषमाजी मला ही माहिती दिल्याबद्दल आभार. मी तयार केलेल्या धोरणानुसार बदलीचे प्रकरण मी पाहत नाही. हा अधिकार रेल्वे बोर्डाचा आहे. मी या प्रकरणी नियमानुसार कारवाई करण्यास सांगेल. 

दुसऱ्या व्यक्तीला दिले वनवास संपवण्याचे आश्वासन 
- शनिवारी अमेरिकेच्या एका व्यक्तीने सुषमा यांनी ट्वीट केले. त्यात लिहिले, हॅलो मॅम, माझ्या पत्नीला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत करा. पासपोर्टमुळे मला इथे एकट्याला राहावे लागत आहे. 
- त्यावर सुषमा यांनी उत्तर दिले होते, हा वनवास लवकरच संपेल. 
- विदेशात अडचतणीत सापडलेल्या लोकांनी संबंधित भारतीय मिशनलाही एक ट्वीट करावे आणि त्यांनाही टॅग करावे, त्यामुळे त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष ठेवता येईल. 
- काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने सुषमा स्वराज यांच्या ट्वीटरवर कामधून निघणाऱ्या धुराची तक्रार करत मदत मागितली होती. 
- त्यावर सुषमा स्वराज यांनी कार गॅरेजमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सुषमा स्वराज यांना आलेले ट्वीट आणि त्यांनी दिलेले उत्तर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)