आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspect Trying To Cross Indo Pak Border Shot Dead By BSF

पठाणकोट: पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; एक संशयित BSFच्या गोळीने ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
पठाणकोट - पंजाबमध्ये पठाणकोटजवळ बमियाल सेक्टरमध्ये सीमेपलिकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला बीएसएफने ठार केले आहे. दोन संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले

बीएसएफने काय सांगितले
- बीएसएफचे म्हणणे आहे, की तीन संशयित भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते.
- आमच्या वॉर्निंगनंतरही ते थांबले नाही, त्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला गोळीबार करावा लागला.
- गोळीबारात एक संशयित मारला गेला. मारला गेलेला दहशतवादी होता, की तस्कर याचा तपास सुरु आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर बीएसएफमध्ये बदली सत्र
पठाणकोट एअरबेसवर हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृह खात्याने कारवाई सुरु केली आहे. सीमा सुरक्षा विभागाचे (बीएसएफ) महानिरीक्षक एन. के मिश्रा आणि कमांडेंट एस.एस.दवास यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. हे अधिकारी गुरदासपुर सेक्टरमध्ये तैनात होते. त्यांच्या जागेवर अनुक्रमे एन. श्रीनिवासन आणि इंद्र प्रकाश भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाच महिन्यात दोन हल्ले झाल्याने बीएसएफवर प्रश्नचिन्ह
पंजाब सीमा भागात बीएसफ तैनात आहे. येथूनच घुसखोरी होत आहे. ऑगस्ट 2015 मध्ये गुरदासपूरमध्ये दहशतवादी घुसले होते. त्यानंतर 2 जानेवारी रोजी पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला.
दोन्ही हल्ल्यांवेळी दहशतवाद्यांनी पठाणकोट जवळील दरिया उज्ज भागातून घुसखोरी केली. ही बीएसएफच्या सुरक्षेतील सर्वात मोठी चूक मानली जात आहे.