आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरेकी असल्याचा संशय; तिघांना तामिळनाडूत अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मदुराई : राष्ट्रीय तपास संस्थेने नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) तामिळनाडूतून तीन लोकांना अल कायदाचे दहशतवादी असल्याच्या संशयावरून अटक केली. पोलिसंाच्या मतानुसार, तिन्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशाच्या २२ शीर्षस्थ-टॉपच्या नेत्यांवर हल्ल्याची तयारी ते करत होते. आरोपींवर भारतात विभिन्न देशांच्या दूतावासास धमक्या देण्याचाही आरोप आहे.
पोलिसांनी म्हटले आहे की, अटकेतील लोकांची नावे एम. करीम, आसिफ सुल्तान मोहंमद व अब्बास अली ही आहेत. ते दक्षिण तामिळनाडूत अल कायदाची एक शाखा चालवत होते. गेल्या काही दिवसांत देशात झालेल्या वेगवेगळ्या स्फोटांतही यांचा हात राहिलेला आहे. तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणांवरील छाप्यात ते पकडले गेले आहेत. त्यांच्याकडून स्फोटांची सामग्री व हत्यारेदेखील जप्त करण्यात आली आहेत. एनआयए आता हकीम व दाऊद सुलेमान नावाच्या दोन आणखी संशयितांचा शोध घेत आहेत. एनआयएने ही कारवाई तामिळनाडू, कर्नाटक पोलिसांच्या मदतीने केली.
बातम्या आणखी आहेत...