आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुजानाच्या एन्काऊंटराच बदला घेणार, अकालतख्त एक्स्प्रेसमध्ये बॉम्बसोबत सापडले पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉम्ब सापडल्याचे कळाल्यानंत तीन तासांनी पथक पोहोचले. - Divya Marathi
बॉम्ब सापडल्याचे कळाल्यानंत तीन तासांनी पथक पोहोचले.
लखनऊ - उत्तर प्रदेशात अमेठीजवळ अकबरगंज रेल्वे स्टेशनवर कोलकाता ते अमृतसर जाणारी अकालतख्त एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये स्फोटके सापडली आहेत. त्यासोबतच एक पत्रही मिळाले. त्यात लिहिले आहे, 'दुजानाच्या शहादतचा बदला हिंदूस्थानला चुकवावा लागेल.' स्फोटके आणि पत्राची माहिती पसरल्यानंतर खळबळ उडाली. जीआरपीचे पोलिस अधीक्षक सौमित्र यादव म्हणाले, 'कमी तीव्रतेचे डिव्हाइस सापडले होते. ते निकामी करण्यात आल्यानंतर रेल्वे रवाना करण्यात आली.'
 
रात्री 1 वाजताची घटना, सकाळी 4 वाजता पोहोचला स्कॉड 
- कोलकाताहून अमृतसरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बुधवारी उशिरा रात्री 1.15 वाजता संशयास्पद वस्तू सापडली. ती स्फोटके असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. 
- घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमेठी पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र बॉम्ब नाशक पथक पोहोचण्याला तब्बल तीन तास लागले. पहाटे 4 वाजता बॉम्ब स्कॉड घटनास्थळी पोहोचले. 
- लखनऊ विभागाचे आरपीएफ कमांडंट सत्य प्रकाश म्हणाले, 'अकबरगंज स्टेशनवर अकालतख्त एक्स्प्रेसमध्ये बी-3 कोचमधील टॉयलेटमध्ये बॉम्बसारखी वस्तू आढळली होती.'
 
दहा दिवसांपूर्वी झाले दुजानाचे एन्काऊंटर 
- काश्मीरच्या पुलवामा येथे 1 ऑगस्ट रोजी झालेल्या एन्काऊंटरमध्ये लष्कर-ए-तोएबाचा टॉप कमांडर अबु दुजाना मारला गेला होता. 
- अकालतख्त एक्स्प्रेसमध्ये सापडेल्या स्फोटकांसोबत, दुजानाच्या हत्येचा जाब भारताला द्यावा लागेल, अशा आशयाचे पत्र सापडले आहे.  
बातम्या आणखी आहेत...