आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेता चिन्मयानंद यांनी अपहरण करून केला बलात्‍कार, साध्‍वीचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देहराडून - पूर्वी साध्‍वी आणि आता गृहिणी असलेल्‍या एका महिलेला आणि तिच्‍या मुलांना भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांनी डांबून ठेवले, असा आरोप पीडित महिलेच्‍या पतीने केला. या बाबत आज (सोमवारी) एक व्‍ह‍िडिओ समोर आला आहे. दरम्‍यान, या महिलेने यापूर्वीच स्‍वामी चिन्मयानंद यांच्‍यावर बलात्‍काराचा आरोप केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्‍या आधारे स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्‍याचे आदेशही दिले होते.
काय आहे व्‍ह‍िडिओमध्‍ये
बदायूंमध्‍ये राहणारी एक व्‍यक्‍ती आ‍पल्‍या पत्‍नी आणि मुलांना घेण्‍यासासाठी देहराडूनच्‍या एका फ्लॅटवर गेली असता चिन्मयानंद यांच्‍यासोबत तिचा वाद झाला, असे या व्‍हिडिओमध्‍ये दिसत आहे.
काय आहे प्रकरण ?
आरोप करणारी महिला लग्‍नापूर्वी साध्वी होती. काही वर्षांपूर्वी तिने लग्‍न करून गृहस्थ जीवन स्‍वीकारले. मात्र, तिने घेतलेला हा निर्णय स्‍वामी चिन्मयानंद यांना मान्‍य नव्‍हता. त्‍यामुळेच त्‍यांनी तिला जबरदस्‍तीने उत्तराखंडमधील देहराडूनच्‍या वैष्णवी अपार्टमेंटमध्‍ये नेले. एवढेच नाही तिथे तिला आणि माझ्या मुलांना डांबून ठेवले. शिवाय त्‍यांनी बाहेर पडू नये, यासाठी देखरेख करण्‍याकरिता चार जणांना 24 तासांसाठी तैनात केले. मी माझी पत्‍नी आणि मुलांना घेण्‍यास गेलो असता चिन्‍मयानंद यांनी वाद घातला.
चिन्मयानंद यांनी काय म्‍हटले ?
ज्‍या महिलेने आणि तिच्‍या नवऱ्याने आरोप केले त्‍यांना आपण पूर्वीपासूनच ओळखतो, असे चिन्मयानंद यांनी म्‍हटले. मात्र, ही महिला आपल्‍याला ब्‍लॅकमेल करत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. त्‍यांनी म्‍हटले, '' या महिलेने राहण्‍यासाठी आपल्‍याकडे फ्लॅट मागितला होता. मागील 11 वर्षांपासून ती माझ्याकडे आहे. मीच तिच्‍या शिक्षणाचा खर्च केला. तिची मदत केली. आता खोटे बोलून ती मला फसवत आहे'', असे ते म्‍हणाले. एवढेच नाही तर त्‍यांनी अपहरणाचे आरोप फेटाळून लावले असून, ही महिला रोज बाजार आणि गंगा नदीची पूजा करण्‍यासाठी बाहेर जात होती तर मग तिचे अपहरण केले कसे कसे म्‍हणता येईल, असा प्रश्‍नही त्‍यांनी उपस्‍थ‍ित केला.
कोण आहेत चिन्मयानंद?
भाजपच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांपैकी ते एक आहेत. वाजपेयी सरकारमध्‍ये त्‍यांच्‍याकडे गृह राज्य मंत्री होते. यूपीतील जौनपूर लोकसभा मतदार संघाचे त्‍यांचे प्रतिनिधित्‍वही केले होते.