आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍वामी विवेकानंदांचे हे सुविचार आहेत प्रेरक, सोबत पाहा 15 दुर्मिळ फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलकत्‍ता- एक योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान असलेले स्वामी विवेकानंद यांची आज पुण्‍यतिथी. स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आजही आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते. प्रेरणा मिळते. स्वामी विवेकानंदांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्‍वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्‍वास होता. देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत, असे नाही. संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले. त्‍यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्‍त या संग्रहात स्‍वामी विवेकानंद यांचेे काही दुर्मिळ फोटो व सुविचार पाहूया..

विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्‍यांना नरेंद्र, नरेन असेही म्‍हणत. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये आजही रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. राजा अजितसिंग खेत्री यांनी 10 मे 1893 रोजी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.
कलकत्त्यामधील सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी विवेकानंदांचा जन्म झाला. त्‍यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, स्‍वामी विवेकानंद यांचे दुर्मिळ फोटो, प्रत्‍येक फोटोसह वाचा सुविचार..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...