आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Swamiprasad Maurya News In Marathi, BSP, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्न समारंभात गौरी-गणेशाची पूजा नको : स्वामीप्रसाद मौर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - ‘लग्न समारंभात गौरी-गणेश यांची पूजा करू नका. या मनुवादी व्यवस्थेत दलित आणि मागासलेल्या जातींची दिशाभूल करून त्यांना गुलाम बनवण्याचा कट आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य बसपा सरचिटणीस स्वामीप्रसाद मौर्य यांनी केले आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मात्र ते मौर्य यांचे व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्ट केले आहे.
कर्पूरी ठाकूर भागीदारी महासंमेलनात मौर्य यांचे भाषण झाले. ‘हिंदू धर्मात माणसाला कुठलेही स्थान नाही. या धर्मात अनुसूचित जाती, जमाती आणि दलित हे सर्व शूद्र आहेत. शूद्रांना कुठलाही सन्मान दिला जात नाही.’ भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मौर्य यांच्या विधानावर टीका केली आहे.