जयपूर - राजस्थान शेजारी राज्य गुजरातमध्ये स्वाइन फ्लूने मरणार्यांची संख्या १२२ वर गेली आहे. राजस्थानात स्वाइन फ्लूने ६७ रुग्णांचे मृत्यू झाले असून गुजरातमध्येही ५५ जणांचे बळी गेले आहेत. राजस्थान सरकारने टास्क फोर्स गठित केला असून सर्व प्राथमिक तसे उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रार्थना सभा घेण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच याबाबत जागरूकता आणण्यासाठी टास्क फोर्स गठित करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात एक तसेच श्रीगंगानगरच्या रुग्णालयात एका जवानाचा मृत्यू झाला. आतापर्यंत स्वाइन फ्लूचे १२०० नमुने घेण्यात आले असून पैकी ३६६ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गुजरातमध्येही स्वाइन फ्लूच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी शाळांमध्ये मुलांना जागरूक करण्यात आले आहे. शाळांमध्ये मास्क किंवा रुमाल बांधून येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यात स्वाइन फ्लूने ५५ रुग्णांचे बळी गेले आहेत.