स्विस बँकेमध्ये काळा पैसा लपविणा-या संशयीत भारतीयांची यादी तयार केली असल्याची माहिती स्विर्त्झलँड सरकारने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये काळ्या पैशाविरोधात आंदोलने झाली आहेत. हा पैसा भारतात परत आणावा यासाठीची मागणी जोर धरत होती.
कर चुकविण्यासाठी काही व्यक्ती संस्थांच्या नावे, कंपन्यांच्या नावे स्विस बँकेत ठेवत असल्याची माहिती स्विस प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली. भारताने काळ्या पैशांसंदर्भातील नेमलेल्या तपासणी समितीलाही योग्य ते सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उभय देशांमध्ये असलेल्या गोपनियतेच्या करारामुळे बॅंकेमध्ये भारतीयांचा काळा पैसा किती आहे आणि पैसा लपविणा-यांची नावे काय आहेत याविषयी उघडपणे सांगता येत नसल्याचेही त्याने सांगितले.