आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस पर्यटक महिलेवर मध्य प्रदेशात सामूहिक अत्याचार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दतिया (म.प्र.) - स्वित्झर्लंडहून पतीसोबत भारतात आलेल्या महिलेवर मध्य प्रदेशात सामूहिक अत्याचार करण्यात आला. सायकलवरून हे दांपत्य भारतभ्रमणासाठी निघाले होते. दतिया-सेवडा मार्गावर झारिया गावानजीक शुक्रवारी दोघेही तंबू ठोकून मुक्कामी थांबले होते. तेव्हा रात्री नऊ वाजेच्या सुमारास 7 नराधमांनी मारहाण करत पतीला जखडून ठेवले. त्याच्यासमोरच महिलेवर कुकृत्य केले.

पोलिसांनी 20 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची ओळखपरेडही झाली. तथापि, पोलिसांनी याबाबत माहिती दिलेली नाही. आरोपींनी दांपत्याजवळील लॅपटॉप, 10 हजार रुपये व मोबाइलही पळवला. ही घटना दतियापासून 5 कि.मी.वर घडली. रस्त्यापासून 300 मीटर आत झाडीत हे दांपत्य थांबले होते. ग्वाल्हेर येथील रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत लिनस वॉन कॅस्टेलमर यांनी पीडितेशी संपर्क साधून मदतीची हमी दिली. तसेच अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली.

मुंबईतही महिलेवर पाच जणांचा अत्याचार
मुंबई - माटुंगा येथील रेल्वे यार्डजवळ 30 वर्षीय महिलेवर 5 जणांनी शुक्रवारी रात्री सामूहिक अत्याचार केला. जवळच्या शेतात ही महिला कामास आहे. रात्री बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. भांडुप येथेही 17 वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या तिच्या नातेवाइकास अटक करण्यात आली आहे.